Vivo चा 50MP कॅमेरा अन् 5,500mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन लॉन्च, किंमत किती? फीचर्स काय? वाचा…
Vivo ने Y सीरिजमधील एक स्वस्त फोन भारतात लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 5,500mAh ची शक्तिशाली बॅटरी, फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा यासह अनेक दमदार फीचर्स आहेत.

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. Vivo ने Y सीरिजमधील एक स्वस्त फोन भारतात लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Y400 Pro असे आहे. या फोनमध्ये 5,500mAh ची शक्तिशाली बॅटरी, फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा यासह अनेक दमदार फीचर्स आहेत. हा Vivo फोन फ्री स्टाईल व्हाइट, फेस्ट गोल्ड आणि नेब्युला पर्पल या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन Y200 Pro चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या फोनची किंमत किती आहे आणि फीचर्स काय आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.
Vivo Y400 Pro 5G ची वैशिष्ट्ये
Vivo Y400 Pro 5G या फोनला IP65 रेटिंग देण्यात आलेले आहे. पाण्यामुळे आणि धुळीमुळे हा फोन खराब होत नाही. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर आधारित असून तो Funtouch OS 15 वर काम करतो. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसरसह येतो. हा 8GB RAM आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5,500mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि 90W फास्ट चार्जर मिळतो.
डिस्प्ले आणि सेंसर
विवोच्या या फोनमध्ये 6.77-इंचाचा कर्व्ह AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्ले 120Hz हाय रिफ्रेश रेट आणि 4,500 nits ब्राइटनेस फीचरला सपोर्ट करतो. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॅपेसिटिव्ह मल्टी-टच सेन्सर आहे.
कॅमेरा
Vivo Y400 Pro 5G या फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 50MP चा मेन कॅमेरा आहे. तसेच या फोनमध्ये 2MP चा सेकंडरी कॅमेरा देण्यात आलेला आहे. या विवो फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये ड्युअल 5 जी सिम कार्ड मिळतील. तसेच फोनमध्ये ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ सारखे फीचर्सही मिळतात.
किंमत किती?
Vivo चा हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. पहिला 8GB RAM + 128GB आणि दुसरा 8GB RAM + 256GB. या फोनची किंमत 24,999 रुपये आहे. या फोनचे टॉप व्हेरिएंट 26,999 रुपयांना मिळते. कंपनीने या फोनची प्री-बुकिंग सुरू केली आहे. तसेच या फोनच्या खरेदीवर 2,500 रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट दिला जात आहे. हा Vivo फोन कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर आणि रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येणार आहे. तसेच हा फोन फ्लिपकार्टवरही उपलब्ध असणार आहे.
