रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, जाल तिथे टाकून बसता येईल अशी फोल्डेबल खुर्ची

सध्या संपूर्ण जगात अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीच्या (Technology) वस्तू लाँच होत आहे. या टेक्नॉलॉजीच्या (Technology) आधारावर जगात अनेक बदल झाले आहेत.

रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, जाल तिथे टाकून बसता येईल अशी फोल्डेबल खुर्ची

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जगात अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीच्या (Technology) वस्तू लाँच होत आहे. या टेक्नॉलॉजीच्या (Technology) आधारावर जगात अनेक बदल झाले आहेत. दररोज बाजारात नव्या वस्तू येत आहेत. ज्यामुळे आपले आयुष्य सोयीस्कर होत आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारत आता एक खुर्ची आली आहे. या खुर्चीचे महत्त्व म्हणजे ही खुर्ची आपण आपल्यासोबत घेऊन फिरु शकतो. या खुर्चीला विअरेबल खुर्ची (Wearable chair) असं म्हणतात.

या खुर्चीला विअरबेल चेअर (Wearable chair) म्हणून ओळखलं जाते. या खुर्चीला आपण कमरेला फिट करु शकतो. यानंतर तुम्हाला कुठेही बसायचे असल्यास खुर्ची ऑटोमॅटिक अनफोल्ड होईल आणि तुम्ही बसू शकता. या खुर्चीमुळे तुम्ही रेल्वे स्टेशन, बस स्टॉप किंवा जिथे जाल तिथे टाकून तुम्ही सहज बसू शकता. ही खुर्ची कपड्याची बनली असून खूप हलकी आहे. यामध्ये दोन छोटे स्टँड दिले आहेत.

या विअरबेल खुर्चीचा वापर कसा करायचा याबद्दलचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. टेक इनसाईडर यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या खुर्चीचे वजन 1.5 किलोग्राम आहे. तसेच ही खुर्ची 120 किलोग्रामपर्यंतच्या व्यक्तीचे वजन झेलू शकते.

या खुर्चीची किंमत 186 यूएस डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 13 हजार 240 रुपये आहे. ही किंमत भारतीयांना अधिक वाटू शकते. पण या खुर्चीच्या वापराने लोकांना गर्दीच्या ठिकाणी बराच वेळ उभं राहवे लागणार नाही. सहज कुठेही बसता येणार आहे.

दरम्यान, काही लोक या खुर्चीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने या विअरेबल खुर्चीचा वापर केला, तर तो नेहमी कसा या खुर्चीवर बसून राहील. त्याला हा चेअरचा किट बऱ्याचदा काढावाही लागू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI