Login मध्ये Sign In काय फरक? टेक्नॉलॉजियातील ही काय भानगड?
Log in आणि Sign in हे दोन्ही शब्द एकसारखे भासतात. पम तंत्रज्ञानाच्या जगात या शब्दांचा वेगळा अर्थ आणि महत्त्व आहे. या शब्दाची अर्थछटा समजून घेतल्यास तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करू शकाल. काय आहे दोन्ही शब्दातील तो फरक?

Difference Between Log in and Sign in : इंटरनेट आणि मोबाइल ॲप्सच्या जगात आपण रोज Log in आणि Sign in या शब्दांचा वापर करतो. पण अनेकदा रोजच्या वापरातील या शब्दांची गफलत होते. हे दोन्ही शब्द एकसमान भासतात. त्यामुळे लोकांनी हे एकमेकांना पूरक शब्द असल्याचा ग्रह केला आहे. या दोन्ही शब्दांच्या अर्थछटा भिन्न आहेत. दोघांमध्ये चांगलाच फरक आहे. या दोन्ही शब्दांचा खरा अर्थ आणि त्याचा योग्य उपयोग जाणून घ्या.
Login चा अर्थ काय?
Login शब्दाचा थेट अर्थ म्हणजे सर्वात अगोदर खात्यात प्रवेश करणे. जेव्हा तुम्ही कोणत्याही साईटवर वा ॲपवर युझरनेम आणि पासवर्ड टाकता तेव्हा Log in करता. म्हणजे ही प्रक्रिया अकाऊंटपर्यंत पोहचण्यासाठी आहे. ही प्रक्रिया तुम्ही अगोदरच केलेली असते. उदाहरण म्हणून Gmail वा Facebook खाते उघडण्यासाठी युझर ID आणि पासवर्ड टाकून Log in करावे लागते.
Sign in चा अर्थ काय?
Sign in पण त्या साईटच्या खात्याचा ॲक्सेस करण्यासाठी वापरतात. म्हणजे जर तुम्ही फेसबुक वा इतर प्लॅटफॉर्मवर खाते तयार करत असाल तर अगोदर साईन-इन करायला सांगतात. हा सर्वाधिक युझर फ्रेंडली शब्द आहे. टेक कंपन्यांनी युझर्सला सहज आणि सरळ अनुभव देण्यासाठी Sign in चा वापर करतात. दोन्ही काम जवळपास सारखीच असतात. त्याच्या संज्ञेत मात्र फरक आहे. Google वा Microsoft या सारख्या प्लॅटफॉर्मवर Sign in दिसते.
Log in आणि Sign in मध्ये मोठा फर्क आहे का?
Log in आणि Sign in दोघांचे काम खात्यापर्यंत पोहचणे असेच आहे. पण Sign in शब्द जास्त आधुनिक आणि उपयोगासाठी सरळ आणि सहज आहे. तर Login हा तांत्रिक आणि पारंपारिक शब्द मानल्या जातो. त्यामुळे नवीन साईट अथवा ॲप्स आता Sign in या शब्दाचा सर्रास वापर करताना दिसतात.
Log in, Sign in आणि Sign up मध्ये काय अंतर?
Login आणि Sign in व्यतिरिक्त Sign Up शब्दाचा पण अधिक वापर करण्यात येतो. ऑनलाईन जगतात हे तीन शब्द परवलीचे आहेत. त्याच्या अर्थछटा मात्र वेगळ्या आहेत. Sign up चा अर्थ नवीन अकाऊंट तयार करणे. तुम्ही जेव्हा एखाद्या नवीन साईट अथवा ॲपवर जाता. तेव्हा नोंदणी करावी लागते.
