AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगलचे हे नवीन फीचर तुम्हाला हॅकिंगपासून वाचवेल, असे करा चालू

जर तुम्हाला तुमचे गुगल अकाउंट हॅक होण्यापासून वाचवायचे असेल तर गुगलचा नवीन प्रोग्राम तुम्हाला मदत करेल. गुगलची ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे आणि याद्वारे तुम्ही तुमच्या अकाउंट आणखी एक प्रोटेक्शन लेअर ॲड करता येणार आहे.

गुगलचे हे नवीन फीचर तुम्हाला हॅकिंगपासून वाचवेल, असे करा चालू
Google Advanced Protection ProgramImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: May 08, 2025 | 10:59 PM
Share

आजकाल ऑनलाइनच्या दुनियेत आर्थिक व्यवहार तसेच सोयीसुविधा सोईस्कर होण्यासाठी डिजिटल पद्धतीने काम करत आहोत. मात्र या ऑनलाईनच्या माध्यमातुन अकाउंटवर हॅकिंग आणि सायबर हल्ल्यांचा धोका झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गुगलने आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक खास फीचर लाँच केले आहे. ज्याला गुगल अॅडव्हान्स्ड प्रोटेक्शन प्रोग्राम (Google Advanced Protection Program) म्हणतात. हा कार्यक्रम विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांना उच्च धोका आहे, जसे की पत्रकार, राजकारणी, सेलिब्रिटी, सरकारी अधिकारी किंवा ज्यांचा डेटा खूप महत्वाचा आहे. गुगलचा हा प्रोग्राम काय आहे आणि तो कसा काम करतो ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

गुगल ॲडव्हान्स्ड प्रोटेक्शन म्हणजे काय?

गुगल ॲडव्हान्स्ड प्रोटेक्शन हा एक प्रोटेक्शन प्रोग्राम आहे जो तुमच्या जीमेल, गुगल ड्राइव्ह, फोटो आणि इतर गुगल अकाउंटना अतिरिक्त प्रोटेक्शन देतो. यात एक मजबूत सेक्यूरिटी लेअर आहे जो सामान्य लॉगिनपेक्षा खूपच सुरक्षित आणि चांगला आहे.

त्याचे फायदे काय आहेत?

  • स्ट्रॉन्ग लॉगिन सेक्यूरिटी: लॉगिन करण्यासाठी (Security Key) आवश्यक आहे.
  • फिशिंगपासून संरक्षण: बनावट वेबसाइट किंवा ईमेलच्या फिशिंग हल्ल्यांपासून संरक्षण करते.
  • अज्ञात ॲप्स ब्लॉक करणे: हे सेक्यूरिटी लेअर थर्ड-पार्टी ॲप्सना ब्लॉक करते ज्यांना तुमचा डेटा अ‍ॅक्सेस हवा असतो पण ते सुरक्षित नसतात.
  • रिकव्हरी प्रोसेस कठीन असते: तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलात तरीही,रिकव्हरी प्रोसेस नियमित खात्यांपेक्षा सुरक्षित असते.

गुगलचे ॲडव्हान्स्ड प्रोटेक्शन फिचर्स कसे चालू करावे?

यासाठी, प्रथम https://g.co/advancedprotection वर जा. यानंतर तुमच्या गुगल अकाउंटने साइन इन करा. येथील सूचनांचे पालन करून Security Key खरेदी करा आणि सेट अप करा. एकदा सेटअप पूर्ण झाले की, तुमचे अकाउंट ॲडव्हास प्रोटेक्शन मोडमध्ये ठेवले जाईल.

जर तुम्हाला तुमचे गुगल अकाउंट सुरक्षित हवे असेल तर गुगल ॲडव्हान्स्ड प्रोटेक्शन हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात, परंतु ते तुमचा डेटा सुरक्षित ठेवते आणि हॅकिंगपासून वाचवते. अशातच वर उल्लेख केलेल्या पद्धतीने तुम्ही हे फिचर्स चालू करू शकता.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....