AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2045 मध्ये जग कसं असेल? AI नी सांगीतली भविष्यवाणी…

AI ची ही भविष्यवाणी तंत्रज्ञानाच्या अमर्याद शक्यता उघड करते, जिथे स्मार्ट शहरे, डिजिटल आरोग्य आणि नव्या नोकऱ्या दिसतात. मात्र, या प्रगतीसोबतच डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि नैतिकतेची आव्हानंही वाढतात. त्यामुळे नागरिकांनी केवळ तंत्रज्ञानाचा लाभ न घेता त्याचा जबाबदारीने वापर करणे आणि सजग राहणे आवश्यक आहे.

2045 मध्ये जग कसं असेल? AI नी सांगीतली भविष्यवाणी...
AIImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: May 08, 2025 | 10:34 PM
Share

2045 मध्ये आपलं जग आजच्या जगापेक्षा इतकं वेगळं असेल की, सध्या आपण ज्या गोष्टींना भविष्याची स्वप्नं मानतो, त्या गोष्टी वास्तवात उतरत असतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने अशा काही गोष्टींचा अंदाज लावला आहे की ज्या ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

स्मार्ट शहरे : रस्त्यांवरून स्वयंचलित गाड्या धावतील, सिग्नल्स आणि वाहतुकीचा ताळमेळ AI घेईल, आणि घरातले प्रत्येक यंत्र स्मार्ट होऊन तुमच्या आदेशावर चालेल. ‘स्मार्ट सिटीज’ ही संकल्पना तेव्हा फक्त योजनांमध्ये न राहता, प्रत्यक्षात दिसेल.

आरोग्याची काळजी घेणारी यंत्रं : 2045 पर्यंत आरोग्यसेवा पूर्णपणे डिजिटल होईल. प्रत्येक नागरिकाचा हेल्थ डेटा एका क्लिकवर उपलब्ध असेल आणि गंभीर आजार ओळखण्यासाठी AI आधारित स्कॅनिंग यंत्रं कामाला लागतील. डॉक्टरांच्या जागी AI-सहायक निदान करणारी प्रणाली असेल.

शिक्षण : विद्यार्थ्यांना शाळेत बसून शिकायचं कारणच उरणार नाही. व्हर्च्युअल रिअॅलिटीमुळे घरबसल्या इंटरॲक्टिव्ह शिकवणं शक्य होईल. AI प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता ओळखून त्यानुसार अभ्यासक्रम तयार करेल.

नोकरी क्षेत्र : काही पारंपरिक नोकऱ्या कालबाह्य होतील. मात्र, तंत्रज्ञानस्नेही नोकऱ्या निर्माण होतील. सतत नवीन कौशल्यं शिकणं हीच टिकून राहण्याची गुरुकिल्ली असेल.

प्रवासाचा वेग बदलेल : सेल्फ-ड्रायव्हिंग गाड्या सर्वसामान्य होतील. हायपरलूप, फ्लायिंग टॅक्सी यांसारख्या संकल्पना प्रत्यक्षात दिसतील. शहरांदरम्यानचा प्रवास काही मिनिटांमध्ये पार पडेल.

धोके आणि जबाबदाऱ्या

तंत्रज्ञानाचं हे भविष्य जितकं उज्ज्वल आहे, तितकंच ते जोखमीचंही आहे. डेटा सुरक्षेचे प्रश्न, गोपनीयतेची चिंता, आणि AI चं नैतिक नियंत्रण – ही मोठी आव्हानं असतील. यासाठी शासन, कंपन्या आणि नागरिकांनीही सजग राहावं लागेल.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.