इन्स्टाग्राम आणि इन्स्टाग्राम Lite मध्ये नेमका फरक काय? भन्नाट फीचर्स 99 टक्के लोकांना माहितीच नाहीत!
Instagram vs Instagram Lite: तरूण-तरूणी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असतात आणि रील्स, व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असतात. इंस्टाग्रामने अनेक तरूणांना स्टार बनवले आहे. मात्र इंस्टाग्रामचे इंस्टाग्राम लाईट हेही एक व्हर्जन आहे. अनेकांना याबाबत फारसी माहिती नाही.

इंस्टाग्राम अॅपने युवा पिढीला वेड लावले आहे. तरूण-तरूणी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असतात आणि रील्स, व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असतात. इंस्टाग्रामने अनेक तरूणांना स्टार बनवले आहे. मात्र इंस्टाग्रामचे इंस्टाग्राम लाईट हेही एक व्हर्जन आहे. अनेकांना याबाबत फारसी माहिती नाही. यात काही खास फीचर मिळतात. आज इंस्टाग्राम आणि इंस्टाग्राम लाईटमध्ये काय फरक आहे? याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इंस्टाग्राम आणि इंस्टाग्राम लाईटमधील फरक
इंस्टाग्राम अॅप आणि इंस्टाग्राम लाईटमधील सर्वात मोठा फरक हा त्यासाठी लागणाऱ्या डेटाचा आहे. इंस्टाग्राम अॅप डाऊनलोड करण्यासाठी iOS वर 400 MB आणि Android वर 100 MB डेटा लागतो. 2020 मध्ये कंपनीने इंस्टाग्राम लाईट अॅप लाँच केला. इंस्टाग्राम लाईट डाऊनलोड करण्यासाठी खूप कमी डेटा लागतो. इंस्टाग्राम लाईट गुगल प्ले स्टोअरवर 3.2 MB डेटा वापरून डाऊनलोड करता येते. अँड्रॉइडवरील इंस्टाग्राम अॅप गुगल प्ले स्टोअरवरून 102 MB डेटा वापरून डाऊनलोड करता येते. इंस्टाग्राम लाईट iOS वर उपलब्ध नाही.
170 देशांमध्ये इंस्टाग्राम लाईट उपलब्ध
जगातील 170 देशांमध्ये इंस्टाग्राम लाईट उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी स्लो इंटरनेट असते त्या युजर्ससाठी लाईट हा चांगला पर्याय आहे. इंस्टाग्राम लाईट लहान असल्याने ते फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी स्लो इंटरनेट असते, त्या ठिकाणी मुख्य इंस्टाग्राम अॅप नीट काम करत नाही, त्या ठिकाणी लाईट युजर्ससाठी फायदेशीर ठरते. युजर्स याद्वारे फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतात, मात्र यात काही फीचर्स मिळत नाहीत.
प्रमुख फरक
इंस्टाग्रामवर आपण फोटो शेअर करण्यासह छोटे आणि मोठे व्हिडिओ शेअर करू शकतो. तसेच आपल्याला स्टोरी देखील शेअर करता येते. तसेच क्लोज फ्रेंड्सची यादी देखील तयार करता येते, त्याचबरोबर फॉलोअर्सशी संवाद साधण्यासाठी लाईव्ह देखील जाता येते. यातील बरेच फीचर्स इंस्टाग्राम लाईटवर देखील उपलब्ध आहेत, मात्र काही फीचर्स मिळत नाहीत. इंस्टाग्राम लाईटचे वापरकर्ते लाईव्ह जाऊ शकत नाहीत. मात्र उर्वरित फीचर्स वापरता येतात. त्यामुळे ज्या युजर्सना स्लो इंटरनेटची समस्या आहे ते लोक लाईट वापरू शकतात.
