WhatsApp वर Friend In Need Scam द्वारे अनेकांची फसवणूक, स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करता येईल?

Facebook च्या मालकीचे मेसेजिंग अॅप WhatsApp हे सर्वात जास्त वापरले जाणारे आणि आवडते मोबाईल अॅप्लिकेशन आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या अनव्हेरीफाईइड लिंक्स आणि मेसेजद्वारे लोकांना फसवण्याची शक्यता नेहमीच जास्त असते.

WhatsApp वर Friend In Need Scam द्वारे अनेकांची फसवणूक, स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करता येईल?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 3:48 PM

मुंबई : Facebook च्या मालकीचे मेसेजिंग अॅप WhatsApp हे सर्वात जास्त वापरले जाणारे आणि आवडते मोबाईल अॅप्लिकेशन आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या अनव्हेरीफाईइड लिंक्स आणि मेसेजद्वारे लोकांना फसवण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. व्हॉट्सअॅपवर सुरु असलेला एक नवीन स्कॅम उघडकीस आला आहे. या स्कॅमला “फ्रेंड इन नीड” स्कॅम (Friend In Need Scam) असे म्हटले जात आहे. यामध्ये युजर्सना त्यांच्या मित्रांना मदतीची गरज असल्याचे मेसेज आल्याची तक्रार केली आहे. यूकेमधील अनेक युजर्सना असे मेसेजेस आले आहेत. (WhatsApp Friend in Need scam : Here all you need to know, how to remain safe)

या स्कॅमध्ये स्कॅमर्स व्हॉट्सअॅप युजर्सना त्यांच्या मित्राच्या नावाने मेसेज करतात की ते विदेशात आहेत आणि तिथे ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. मेट्रोच्या अहवालानुसार, अलीकडेच एका 53 वर्षीय नर्सला एका मैत्रिणीचा मेसेज मिळाला, ज्यात म्हटले होते की, तिचा मुलगा अडचणीत आहे आणि त्याला मदतीची गरज आहे. त्या नर्सने कोणताही विचार न करता पैसे पाठवले आणि 2,500 पाउंड गमावले. या स्कॅमर्सना लोकांच्या कमजोरीची जाणीव आहे आणि ते जाणूनबुजून अशा लोकांना लक्ष्य करतात ज्यांचा स्वभाव मदत करणारा आहे.

युजर्सना सावधगिरी बाळगण्यास सांगताना, व्हॉट्सअॅपने एका निवेदनात म्हटले आहे की, “तुम्हाला कोणतेही संशयास्पद मेसेज आल्यास, त्यांना कॉल करणे किंवा व्हॉइस नोटची विनंती करणे हा समोरची व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याचा सर्वात जलद आणि सोपा मार्ग आहे.”

‘फ्रेंड इन नीड’ स्कॅम कसा असतो?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्कॅमर तुमच्या मित्र/कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा नंबर हॅक करू शकतात. किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचा मोबाईल हरवला तर त्यांच्या फोनचा वापर असे मेसेज पाठवण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे.

अशा स्कॅम्सपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवणार?

जर तुम्हाला एखाद्या मित्राकडून किंवा कुटुंबातील सदस्याकडून पैसे मागणारा असा मेसेज आला तर लगेच पैसे पाठवण्याऐवजी त्याला कॉल करा आणि मेसेजचा सोर्स तपासा. तसेच, अशा संशयास्पद मेसेजेसमध्ये वापरल्या जाणार्‍या भाषेकडे विशेष लक्ष द्या, कारण अशा मेसेजेसमध्ये टायपिंगच्या चुका खूप जास्त असतात.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(WhatsApp Friend in Need scam : Here all you need to know, how to remain safe)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.