Whatsapp मध्ये कॉल वेटिंगचे नवं फीचर लाँच

व्हॉट्सअॅपमध्ये आता एका नव्या फीचरची एण्ट्री झाली आहे. आता व्हॉट्सअॅप कॉलदरम्यान युजर्सला कॉल वेटिंगचे (Whatsapp call waiting feature) नोटिफिकेशन मिळणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:04 PM, 7 Dec 2019
Whatsapp मध्ये कॉल वेटिंगचे नवं फीचर लाँच

मुंबई : व्हॉट्सअॅपमध्ये आता एका नव्या फीचरची एण्ट्री झाली आहे. आता व्हॉट्सअॅप कॉलदरम्यान युजर्सला कॉल वेटिंगचे (Whatsapp call waiting feature) नोटिफिकेशन मिळणार आहे. हे फीचर आल्यामुळे आता युजर्सचे कॉल मिस होणार नाहीत.

आतापर्यंत युजर्सला व्हॉट्सअॅप कॉलदरम्यान येणाऱ्या दुसऱ्या कॉलचे (Whatsapp call waiting feature) नोटिफिकेशन मिळत नव्हते. पण आता हे नवं फीचर व्हॉट्सअॅपने लाँच केल्यामुळे कॉलिंगदरम्यान दुसरा कॉल रिसिव्ह किंवा तुम्ही कट करु शकता.

आता व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार

व्हॉट्सअॅपचे कॉल वेटिंग फीचर सुरुवातीला iOS साठी रोलआऊट केले होते. आता हे फीचर अँड्रॉईडसाठी सुरु करण्यात आले आहे. हे फीचर टेलिकॉम सर्व्हिसच्या कॉल वेटिंग फीचरसारखे काम करते. हे नवीन फीचर मिळवण्यासाठी युजर्सला गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन लेटेस्ट व्हर्जन 2.19.357 अपडेट करावे लागणार.

कॉल वेटिंग फीचरशिवाय व्हॉट्सअॅप युजर्ससाठी नवीन प्रायव्हेसी सेटिंगही रोलआऊट केली आहे. नवीन प्रायव्हेसी सेटिंग मिळाल्यानंतर आता युजर्स ठरवू शकतो की, ग्रुपमध्ये कुणाला अॅड करु शकता आणि कुणाला नाही. सुरुवातीला काही निवडक युजर्सासाठी हे रोलआऊट करुन पाहिले होते. पण आता हे सर्व युजर्ससाठी उपलब्ध केले आहे.

लवकरच मिळणार नवीन फीचर

लवकरच फिंगरप्रिंट लॉक फंक्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. हे फीचर प्रायव्हेसीसाठी खूप खास आहे. कारण आता युजर्स आपले व्हॉट्सअॅप चाट फोनच्या फिंगर प्रिंट स्कॅनरने सिक्युर करु शकतात. येणाऱ्या काळात कंपनीकडून अनेक फीचर लाँच केले जाणार आहेत. सेल्फ डिस्ट्रक्टिंग मेसेज, डार्क मोड, मल्टीपल डिव्हाईस सपोर्ट आणि हायड म्यूटेड स्टेटसचा समावेश असेल. या फीचरची सध्या तपासणी सुरु असून लवकरच लाँच केले जाणार आहे.