AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता कोणीच खुपसणार नाही नाक ! Whatsapp वर सिंगल चॅटही करू शकता लॉक, प्रायव्हसी होणार मजबूत

WhatsApp Chat lock Feature : तुमचे व्हॉट्सॲपचे चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सॲपमध्ये लवकरच एक उत्तम फीचर् येणार आहे. हे फीचर वापरल्याने युजर्सना काय फायदा मिळेल ते जाणून घेऊया

आता कोणीच खुपसणार नाही नाक ! Whatsapp वर सिंगल चॅटही करू शकता लॉक, प्रायव्हसी होणार मजबूत
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2023 | 12:21 PM
Share

नवी दिल्ली : इन्स्टंट मेसेजिंग ॲप असेलेले 900145(whatsapp) हे जगभरात 2 अब्जाहून अधिक लोक वापरतात. वैयक्तिक संभाषणापासून ते व्यावसायिक कामापर्यंत, आज सर्व काही व्हॉट्सॲपद्वारे केले जाते. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचे व्हॉट्सॲप चॅट (chat) त्याच्यापुरते मर्यादित असावे आणि इतर कोणीही ते वाचू नये. मात्र अनेकवेळा ऑफिस किंवा कॉलेजमधील कामामुळे आपल्याला आपले व्हॉट्सॲप दुसऱ्या कोणत्या तरी सिस्टीमवर उघडावे लागते किंवा आपला मोबाइल फोन दुसऱ्याला द्यावा लागतो. अशा परिस्थितीत समोरची व्यक्ती एकही चॅट ओपन करत नाही ना, अशी भीती त्या व्यक्तीच्या मनात असते कारण प्रत्येकाला त्यांची प्रायव्हसी (privacy) आवडते.

जर तुम्ही तुमचा फोन कामासाठी दुसर्‍या कोणाला वापरायला दिलात, तर ती व्यक्ती तुमचे चॅट्स उघडून वाचणार नाही ना, अशी भीती तुम्हालाही सतावत असेल ना. मात्र आता याची काहीच चिंता करण्याची गरज नाही. कारण हे सर्व टाळण्यासाठी आणि लोकांचे टेन्शन कमी करण्यासाठी व्हॉट्सॲप त्यांच्या युजर्ससाठी लवकरच एक उत्तम फीचर घेऊन येत आहे.

मिळेल हे उत्तम फीचर

व्हॉट्सॲपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइट नुसार व्हॉट्सॲप एका नवीन ‘चॅट लॉक’ फीचरवर काम करत आहे. त्याच्या अंतर्गत यूजर्स पासकोड किंवा फिंगरप्रिंटच्या मदतीने चॅट लॉक करू शकतील. याचा अर्थ तुम्ही तुमचे कोणतेही संभाषण अथवा चॅट लॉक करू शकाल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा फोन दुसर्‍या व्यक्तीला दिला तरी तो चॅट उघडू शकणार नाही किंवा जे चॅट तुम्ही लॉक केले आहे ते उघडणार नाही.

एक प्रकारे, हे नवीन फीचर एक्स्ट्रॉ लेअर ऑफ सेक्युरिटी या पद्धतीने कार्य करेल आणि तुमची प्रायव्हसी कायम राखेल. हे आश्चर्यकारक फीचर व्हॉट्सॲपमध्ये असणार आहे कारण प्रत्येकाला त्यांच्या गप्पा किंवा त्यांची चॅट्स ही स्वत:पुरती मर्यादित ठेवण्याची इच्छा असते.

Wabetainfo ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे जो आपण पाहू शकतो. या स्क्रीनशॉटमध्ये असे दिसून येते की वापरकर्त्यांना ‘चॅट लॉक’ चा पर्याय मिळेल, ज्यामध्ये त्यांना फिंगरप्रिंट किंवा पासकोड इत्यादीची सुविधा मिळेल. सध्या हे नवीन फीचर डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहे, जे आगामी काळात कंपनी कडून रोल आऊट करण्यात येईल अर्थात ते युजर्सच्या वापरासाठी सादर करण्यात येईल. हे चॅट उघडण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी फिंगरप्रिंट लावावे लागेल. तसेच इतर कोणतीही व्यक्ती तुमची चॅट उघडू शकणार नाही.

Whatsapp

Whatsapp

स्टेटसवर लावू शकता व्हॉईस नोट

या फीचरशिवाय, व्हॉट्सॲप अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे जे हळूहळू यूजर्ससाठी लाइव्ह केले जातील. लवकरच WhatsApp वापरकर्ते व्हॉइस नोट्स स्टेटस म्हणून सेट करू शकतील.

Edit फीचर झाले रोल आऊट

दरम्यान, WhatsApp निवडक बीटा टेस्टर्ससाठी एडिट फीचर आणत आहे. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना कीबोर्डच्या वरच्या डिस्प्ले फॉन्ट पर्यायांपैकी एकावर टॅप करून फॉन्ट दरम्यान पचकन स्विच करण्याची परवानगी देते. व्हॉट्सॲप आता वापरकर्त्यांना अनावश्यक फॉन्ट त्वरीत निवडण्याची परवानगी देते.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.