AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Whatsapp वर नवा स्कॅम, एक शब्द लिहिताच बँक खाते रिकामे होईल, नुकसान कसं टाळणार?

Whatsapp वर नवा स्कॅम समोर आलाय. तुम्ही एक शब्द लिहिताच बँक खात्यातील लाखो रुपये लंपास होऊ शकतात. जाणून घ्या धोका कसा टाळाल.

Whatsapp वर नवा स्कॅम, एक शब्द लिहिताच बँक खाते रिकामे होईल, नुकसान कसं टाळणार?
whatsapp newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 11:28 AM
Share

WhatsApp चा वापर जगात कोट्यवधी युजर्सरकडून केला जातोय. याच व्हाट्अॅपवर नवनव्या स्कॅमपासून सावध राहिले पाहिजे. आता एक नवा स्कॅम समोर आला आहे. तुम्ही व्हाट्सअॅपवर ‘NO’ शब्द लिहिला तरी बँक खाते रिकामे होईल, असा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तेलंगणाच्या पोलिसांनी व्हाट्सअॅप युजर्सना सावध केलं आहे. या स्कॅमने एका युजर्सची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकारानंतर तेलंगणामधील हैदराबाद पोलीस आयुक्तांनी युजर्सना घोटाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

हैदराबादच्या पोलिसांच्या माहितीनुसार, स्कॅम करणारे नव्या माध्यमातून लोकांना टार्गेट करत आहेत. हैदराबाद शहर आयुक्त वीसी सज्जानार यांनी युजर्सना ओटीपी कोणालाही  शेअर न करण्याचा सूचना केल्या आहेत. तुम्ही ओटीपी शेअर केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमच्या एका चुकीने तुमची संपूर्ण कमाई गमावू शकता.  स्कॅम करणाऱ्या लोकांचा आंतरराष्ट्रीय किंवा अनोळखी क्रमाकांवरून मेसेज येतो. या मेसेजला प्रत्युत्तर दिल्यास मालवेयर अॅक्टिव्हेट होतो. यानंतर फोनमधून वैयक्तिक माहिती चोरली जाते. या माध्यमातून तुमचे बँक खाते रिकामे करण्यात येऊ शकते. त्यामुळे स्कॅम करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारे ओटीपी किंवा पासवर्ड शेअर करू नये अन्यथा तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही व्हाट्सअॅवर फक्त नो असा रिप्लाय केला, तर खात्यातून पैसे कापल्याचा मेसेज येतो. तुम्ही एटीएम किंवा बँकेतून पैसे न काढताही असा मेसेज येऊ शकतो. तुम्ही मोबाईलवर नो रिप्लाय केला, तर  तुमच्या व्हॉट्सअॅपचा अॅक्सेस हॅकर्सला जातो.

नुकसान कसं टाळणार?

स्कॅम टाळायचा असल्यास आंतरराष्ट्रीय किंवा अनोळखी क्रमांकाच्या मेसेजला उत्तर देऊ नका. तुम्हाला घोटाळा होण्याची शक्यता वाटत असेल, तर तुम्ही तातडीने 1930 या क्रमाकांवर कॉल करू शकता. या क्रमाकांवरच तक्रार नोंदवावी. तुम्ही संचार साथी या अॅपवरूनही तक्रार करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही मोबाईलमध्ये अँटी व्हायरस इन्स्टॉल करावा. जेणेकरून वायरस किंवा मालवेयर ब्लॉक करण्याचे काम केलं जाईल. यामुळे फोनचा अॅक्सेस ब्लॉक होईल. त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान टळेल.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा