AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लिपकार्ट की ॲमेझॉन… कोणत्या प्लॅटफॉर्मवर आयफोन 17 प्रो मॅक्सवर मिळतेय मोठी सुट, जाणून घ्या

जर तुम्हालाही आयफोन 17 प्रो मॅक्स हे फ्लॅगशिप मॉडेल खरेदी करायचे असेल, तर सर्वप्रथम फ्लिपकार्टवर हा फोन तुम्हाला कोणत्या किंमतीत मिळेल आणि ॲमेझॉनवर हा फोन कोणत्या किंमतीत विकला जात आहे? हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

फ्लिपकार्ट की ॲमेझॉन... कोणत्या प्लॅटफॉर्मवर आयफोन 17 प्रो मॅक्सवर मिळतेय मोठी सुट, जाणून घ्या
17 Pro Max
| Edited By: | Updated on: Jun 25, 2026 | 2:16 PM
Share

तुम्ही जर ॲपलच्या नवीनतम आयफोन 17 सिरीजमधील फ्लॅगशिप मॉडेल आयफोन 17 प्रो मॅक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हजारो रुपये वाचवण्यासाठी या फोनसाठी कोणत्या ई-कॉमर्स साईटवर मोठी स‍वलत दिली जात आहे हे जाणून घेतले पाहिजे. तर तुम्हाला माहित आहे का की फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यांपैकी कोणता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आयफोन 17 प्रो मॅक्सचा 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सर्वात कमी किमतीत विकत आहे? चला तर मग आजच्या लेखात आपण या ऑफरबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

फ्लिपकार्टवरील आयफोन 17 प्रो मॅक्स 256 जीबी किंमत

सर्वप्रथम फ्लिपकार्टवरील आयफोन 17 प्रो मॅक्स फोनच्या किंमतीबद्दल जाणून घेऊयात. प्रो मॅक्सचा 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 5% टक्के सवलतीसह 1 लाख 42 हजार 900 रूपयांना विक्रीसाठी उपलब्ध केला गेला आहे. या फोनसोबत आकर्षक बँक ऑफर्ससुद्धा मिळत आहेत, ज्यामुळे तुम्ही 6 हजार रूपयांपर्यंत बचत करू शकतात. यामध्ये एसबीआय (SBI) आणि ॲक्सिस (Axis) कार्डवर 6 हजार रूपयांची एचडीएफसी (HDFC) कार्डवर 3 हजार 250 रूपये आणि आयसीआयसीआय (ICICI) कार्डवर 3 हजार रूपयांच्या सवलतीचा समावेश आहे.

ॲमेझॉनवरील आयफोन 17 प्रो मॅक्स 256 जीबी‍ व्हेरिएंटची ही आहे किंमत

सध्या ॲमेझॉनवर आयफोन 17 प्रो मॅक्सच्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटवर कोणतीही सूट नाही, म्हणजेच तो तुम्हाला 1 लाख 49 हजार 900 रूपयांना खरेदी करावा लागेल. तुमच्याकडे SBI, ICICI किंवा Axis बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्हाला 4 हजार रूपयांची त्वरित सूट मिळू शकते. बँकेच्या ऑफरचा लाभ घेतल्यानंतरही हा फोन फ्लिपकार्टवरील फोनपेक्षा महाग असेल, जो बँक कार्डच्या सवलतीनंतर 1 लाख 45 हजार 900 रूपयांना विकला जात आहे.

आयफोन १७ प्रो मॅक्सचे फिचर्स

या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.9-इंचाचा OLED डिस्प्ले आहे आणि तो A19 प्रो बायोनिक प्रोसेसरवर चालतो. फोन थंड ठेवण्यासाठी आणि उष्णता बाहेर टाकण्यासाठी कंपनीने यात व्हेपर कूलिंग चेंबरचाही समावेश केला आहे. या फोनमध्ये मागील बाजूस तीन 48-मेगापिक्सलचे कॅमेरे आणि एक 18-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Follow Us
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...