AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची ऑर्डर कुठे आहे हे आता अ‍ॅप न उघडता कळणार, कसं? Android चे नवीन अपडेट

ऑर्डर केली, पण डिलिव्हरी बॉय कुठेय किंवा कॅब किती दूर हे सारखं ॲप उघडून बघावे लागते का? तर आता हा त्रास संपणार! कारण Android 16 घेऊन आलंय एक असं भन्नाट फीचर, जे तुमच्या फोनला बनवेल अजून स्मार्ट! काय आहेत हे नवे बदल? चला, पाहूया या नव्या धमाक्याला!

तुमची ऑर्डर कुठे आहे हे आता अ‍ॅप न उघडता कळणार, कसं? Android चे नवीन अपडेट
orders
| Edited By: | Updated on: Jun 28, 2025 | 12:24 AM
Share

आपण जेव्हा Blinkit, Zomato किंवा कोणत्याही फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून ऑर्डर करतो, किंवा कॅब बुक करतो तेव्हा वारंवार अ‍ॅप उघडून ऑर्डर किंवा ड्रायव्हर कुठे पोहोचला आहे याची माहिती घ्यावी लागते. हा त्रास आता संपणार आहे. गुगलने आपल्या Android ऑपरेटिंग सिस्टीमच्या नव्या Android 16 अपडेटमध्ये असे भन्नाट फिचर्स आणले आहेत, ज्यामुळे स्मार्टफोनचा वापर अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे.

थेट नोटिफिकेशनमध्ये लाईव्ह अपडेट्स

Android 16 मधील सर्वात आकर्षक आणि उपयुक्त फिचर म्हणजे “Real-time Notification Updates”. आता कोणतीही ऑर्डर केल्यावर ती कुठपर्यंत आली आहे, हे बघण्यासाठी अ‍ॅप उघडण्याची गरज नाही. ही सर्व माहिती तुम्हाला फोनच्या नोटिफिकेशन पॅनलमध्ये थेट पाहता येणार आहे. यामुळे यूजरचा वेळ आणि अ‍ॅप उघडण्याचा त्रास वाचणार आहे.

फोनची सुरक्षा अधिक मजबूत

गुगलने यावेळी Android 16 मध्ये युजर्सच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. नवीन “Advanced Protection” फिचर मुळे स्पॅम कॉल्स आणि धोकादायक अ‍ॅप्सपासून संरक्षण मिळणार आहे. शिवाय, एकाच अ‍ॅपमधून येणाऱ्या अनेक नोटिफिकेशन्सना आता गटबद्ध करून दाखवण्यात येणार आहे, त्यामुळे स्क्रीनवर होणारी नोटिफिकेशनची गर्दी कमी होईल.

मोबाईल होणार मिनी कॉम्प्युटर

Android 16 मध्ये आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे “Desktop Windowing”. या फिचरमुळे मोबाईलच्या एका स्क्रीनवर अनेक अ‍ॅप्सची वेगवेगळी विंडो एकाचवेळी ओपन करता येणार आहेत. जणू काही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर काम करत असल्याचा अनुभव मिळणार आहे. सध्या हे फिचर काही निवडक फोन्ससाठीच उपलब्ध असणार आहे, पण भविष्यात टॅबलेट्सना बाह्य डिस्प्लेसोबत जोडून डेस्कटॉपसारखं काम करता येईल.

HDR स्क्रीनशॉट आणि उत्कृष्ट मल्टीटास्किंग

नवीन Android 16 मध्ये आता HDR क्वालिटीमध्ये स्क्रीनशॉट घेता येणार आहेत. विशेषतः टॅबलेट वापरणाऱ्यांसाठी Multitasking अनुभव आणखी सुधारण्यात आला आहे. एकाचवेळी अनेक अ‍ॅप्स वापरणं आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवणं यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरणार आहे.

कोणाला मिळणार हे अपडेट?

सध्या Android 16 अपडेट गुगलच्या Pixel फोन युजर्ससाठी उपलब्ध आहे. लवकरच Samsung, OnePlus, OPPO, Vivo आणि Xiaomi सारख्या कंपन्याही त्यांच्या निवडक स्मार्टफोन्ससाठी हे अपडेट देणार आहेत.

मोबाईलचा अनुभव होणार आणखी समृद्ध

Android 16 मुळे स्मार्टफोन वापरणं केवळ सोपं नव्हे तर अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि प्रभावी होणार आहे. वापरकर्त्यांना आता त्यांची ऑर्डर, कॅब आणि डिलिव्हरीसंबंधीची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. हे अपडेट केवळ युजर फ्रेंडली नसून सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मोठं पाऊल मानलं जात आहे. Pixel फोन वापरणाऱ्यांनी तर लगेच हे अपडेट इन्स्टॉल करून नवीन फिचर्सचा अनुभव घ्यावा, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.