Vivo V60 vs OnePlus Nord 5: कोणता फोन आहे बेस्ट? जाणून घ्या पॉवरफूल प्रोसेसर आणि फीचर्सबाबत
Vivo V60 आणि OnePlus Nord 5 या फोनची बाजारात मोठी मागणी आहे. कारण हा बजेट फोन असून 40 हजारांच्या आत मिळेल. तुम्हालाही या फोनची भूरळ पडली असेल आणि विकत घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

मोबाईल ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. त्यामुळे काही चुटकीसरशी पूर्ण होतात. त्यामुळे हाय प्रोसेसर असलेला फोन घेण्याकडे कल असतो. पण बजेटदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. विवोने 40 हजारांपेक्षा कमी किमतीत विवो V60 5G मोबाईल फोन लाँच केला आहे. या फोनची स्पर्धा थेट वनप्लस नॉर्ड 5 सोबत असणार आहे. त्यामुळे या दोन फोन पैकी कोणता निवडवा असा प्रश्न असेल, तर बातमी तुमच्यासाठी आहे. यामुळे तुम्हाला फोन निवडणं सोपं जाईल. विवोच्या 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये, 8GB/256GB व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये, 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 40,999 रुपये आणि 16GB/512GB व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपये आहे. फोनची प्री-बुकिंग सुरू असून विक्री 19 ऑगस्टपासून विवोच्या साइट, अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू होईल. दुसरीकडे, वनप्लस स्मार्टफोनच्या 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये, 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आणि 12GB/512GB च्या टॉप व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे.चला जाणून घेऊयात शक्तिशाली प्रोसेसर आणि फिचर्सबाबात
Vivo V60 vs OnePlus Nord 5 वैशिष्ट्ये
डिस्प्ले : स्मार्टफोन म्हटला की त्याचा डिस्प्ले हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. विवोमध्ये 6.77 इंचाचा क्वाड-कर्व्हड अमोलेड डिस्प्ले असून रिझोल्यूशन 1.5K आहे. यामुळे 5000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. तर वनप्लसमध्ये स्मार्टफोनमध्ये 6.83 इंचाचा अमोलेड स्क्रीन असून 1800 निट्स ब्राइटनेस आणि 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.
प्रोसेसर : विवोमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 4 प्रोसेसर आहे. तर वनप्लसमध्ये स्नॅपड्रॅगन 8एस जनरेशन 3 प्रोसेसर आहे. नॅनो रिव्ह्यू नेटच्या मते, स्नॅपड्रॅगन 8एस जनरेशन 3 प्रोसेसर सीपीयू आणि गेमिंग परफॉर्मन्ससाठी चांगला आहे. बॅटरी लाइफच्या बाबतीत, दोन्ही प्रोसेसर समान कामगिरी करतात. बॅटरी लाइफच्या बाबतीत दोन्ही प्रोसेसर समान कामगिरी करतात.
बॅटरी: विवोमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्ज सपोर्टसह 6500mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. दुसरीकडे, वनप्लस स्मार्टफोनमध्ये 80W SuperVOOC फास्ट चार्ज सपोर्टसह6800mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. यामुळे बॅटरीवरून अंदाज बांधता येईल.
कॅमेरा सेटअप: विवोमध्ये 50MP Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच 50MP Sony IMX882 टेलिफोटो कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. हा फोन 50-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह मिळेल, इतकेच नाही तर फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. वनप्लसमध्ये 50-मेगापिक्सेल Samsung ISOCELL कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल सोनी कॅमेरा सेन्सर आणि मागील बाजूस 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर आहे.
