AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apple च्या डिवाइसमुळे क्रॅश होऊ शकते विमान ? बंदी घालण्यामागील कारण जाणून घ्या

मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे एअरटॅग खूप महत्त्वाचं डिवाईस मानले जात होते. मात्र, हे डिवाईस थेट विमानच क्रॅश करू शकते असा दावा करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

Apple च्या डिवाइसमुळे क्रॅश होऊ शकते विमान ? बंदी घालण्यामागील कारण जाणून घ्या
Image Credit source: Google
| Updated on: Jan 23, 2023 | 11:59 AM
Share

नवी दिल्ली : Apple कंपनी तिच्या महागड्या किमतीच्या फोन आणि इतर डिवाइससाठी जगभरात भाव खाऊन जाते. Apple चे सर्वच प्रॉडक्ट महाग असूनही खरेदीवर त्याचा परिणाम होत नाही हे या कंपनीचे वैशिष्ट्ये आहे. लाखों रुपयांचे आयफोन्स, लॅपटॉप आहेत तरीही ग्राहक बिनधास्त खरेदी करून आपली हौस पूर्ण करतात. याशिवाय Apple एयरटॅग देखील तयार करते. त्याची किंमतही 3500 रुपये इतकी आहे. ज्याचा वापर विमानाने प्रवास करत असतांना सामानाची ने-आण करण्यासाठी होते. पाळीव प्राण्यांसह इतर गोष्टीही यामधून घेऊन जाता येतात. पण हेच एयरटॅग धोका निर्माण करू शकते. इतकंच काय विमान देखील क्रॅश करू शकते. आणि हे स्वतः विमान सेवा देणाऱ्या कंपनीने सांगितलं आहे. त्यामुळे हवाई प्रवास करणारे जे प्रवासी एयरटॅगचा वापर करतात त्यांना हे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विमानसेवेशी निगडीत असलेल्या एयरटॅगची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

विमानप्रवासाची सेवा देणारी एयरलाइन या कंपनीने एयरटॅगला बंदी घातली आहे. एयरटॅगपासून धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रवासादरम्यान सोबत बाळगता येणार नाहीये.

एयरलाइन विमानाने प्रवास करत असणाऱ्या अनेक प्रवाशांना याबाबत सूचना दिल्या जात आहे, तपासणी दरम्यान असणारे एयरटॅग आढळून आल्यास ते प्रवासादरम्यान बाळगण्यास मनाई आहे.

Apple Air Tag मुळे विमान सिग्नल आणि नेव्हिगेशन सिस्टमवर परिणाम होऊ शकतो, टेक ऑफ आणि लॅंडींगच्या दरम्यान सिग्नलमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विमान अपघात सुध्दा घडू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे.

आत्तापर्यन्त काही मोजक्याच कंपन्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यात एयरलाइन या विमान सेवा देणाऱ्या कंपनीचा समावेश आहे. त्यामुळे Apple सारख्या कंपनीकडून बनविण्यात आलेल्या एयरटॅगला विमानप्रवासादरम्यान बंदी घातल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Follow Us
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?.
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला MVAचा पाठिंबा?
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला MVAचा पाठिंबा?.
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा.
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत...
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत....