AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रायव्हिंग लायसन्स एक्स्पायर असेल तर अपघातानंतर विमा मिळेल का? जाणून घ्या काय आहेत नियम

तुम्ही वाहन चालवत असाल तर ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता वेळोवेळी तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स एक्स्पायर असेल तर अपघातानंतर विमा मिळेल का? जाणून घ्या काय आहेत नियम
| Edited By: | Updated on: Aug 05, 2026 | 4:24 PM
Share

अनेकदा लोक लायसन्स नूतनीकरण (Renew) करण्याचे विसरतात. परंतु, एक्स्पायर्ड ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहन चालवताना अपघात झाल्यास मोटर विम्याचे संरक्षण मिळत नाही. विमा कंपन्या अशा प्रकरणांमध्ये कोणताही क्लेम किंवा नुकसानभरपाई देत नाहीत. त्यामुळे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स नेहमी अपडेट आणि वैध ठेवणे गरजेचे आहे.

भारतात कोणत्याही प्रकारचे वाहन चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप महत्वाचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मर्यादित कालावधीसाठी दिले जाते. जेव्हा तारीख संपते, तेव्हा त्याचे पुन्हा नूतनीकरण करणे आवश्यक आहे, परंतु बरेच लोक परवान्याचे नूतनीकरण न करता वाहन चालविणे सुरू ठेवतात.

आता अशा लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. कारण नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात निकाल दिला आहे. या निर्णयाचा परिणाम वाहन चालविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, रस्ते अपघाताच्या वेळी वाहनचालकाकडे वैध किंवा नूतनीकरण केलेला ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार राहणार नाही. यामुळे वाहनाच्या मालक आणि चालकावर मोठा आर्थिक बोजा पडू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारांना वैध ड्रायव्हिंग लायसन्सचे महत्त्व सांगण्यासाठी देशभरात जनजागृती मोहीम राबवण्याच्या आणि परवाने मिळविण्याची आणि नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. म्हणजेच, जर ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली असेल आणि त्याचे वेळेत नूतनीकरण केले गेले नसेल तर अपघात झाल्यास वाहन मालक आणि ड्रायव्हरला स्वत:च्या खिशातून भरमसाठ भरपाई द्यावी लागू शकते.

ड्रायव्हिंग स्कूलमध्येही सुधारणा करण्याची गरज देशातील ड्रायव्हिंग स्कूलची व्यवस्था सुधारण्याची गरज आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोर्टाच्या मते, ड्रायव्हिंग स्कूलची गुणवत्ता सुधारली पाहिजे. त्यांची फी सामान्य लोकांच्या आवाक्यात असावी. ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज आणि चाचण्या प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध असाव्यात जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना सहजपणे परवाना मिळू शकेल.

कोणत्या परिस्थितीत हा निर्णय आला? 2009 च्या रस्ते अपघाताशी संबंधित खटल्याच्या सुनावणीदरम्यान हा निकाल आला. या प्रकरणात ओम प्रकाश नावाच्या व्यक्तीने चालवलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघाताच्या वेळी ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत फार पूर्वीच संपली होती. नंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवला आणि म्हटले की अपघाताच्या वेळी ड्रायव्हरकडे वैध परवाना नसेल तर अशा परिस्थितीत विमा कंपनीला जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

ड्रायव्हर्ससाठी काय धडा आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सर्व वाहन मालक आणि वाहनचालकांना त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता वेळोवेळी तपासणे आवश्यक झाले आहे. जर परवान्याची मुदत संपणार असेल तर वेळेवर त्याचे नूतनीकरण करा. जर तुम्ही असे केले नाही तर रस्ते अपघात झाल्यास तुम्हाला केवळ कायदेशीर कारवाईलाच सामोरे जावे लागू शकत नाही, तर तुम्हाला तुमच्या स्वत:च्या खिशातून भरमसाठ भरपाई देखील द्यावी लागू शकते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी