AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wireless Headphone : नवीन वायरलेस Portronics Muffs A हेडफोन लाँच, एक तासाची चार्जिंग 30 तास चालते, काही खास गोष्टीही जाणून घ्या…

हेडफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झाल्यास यात ब्लूटूथ v5.2, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे. यात IPX5 रेटिंग आहे, जे हेडफोनचे पाणी, घाम आणि धूळ यांच्यापासून संरक्षण करते. हेडफोनचे वजन सुमारे 170 ग्रॅम आहे.

Wireless Headphone : नवीन वायरलेस Portronics Muffs A हेडफोन लाँच, एक तासाची चार्जिंग 30 तास चालते, काही खास गोष्टीही जाणून घ्या...
Portronics Muffs AImage Credit source: social
| Updated on: Jul 12, 2022 | 9:08 AM
Share

नवी दिल्ली :  वायरलेस हेडफोनमध्ये आजकाल अनेक प्रकार आले आहेत. त्याची मागणी वाढल्यानं वायरलेस हेडफोनचं मार्केट देखील वाढत असल्याचं दिसतंय. वायरलेस हेडफोन हे विविध कंपन्याचे एकापेक्षा एक चांगले येतायत. यातच आता पोर्ट्रोनिक्स (Portronics Muffs A) वायरलेस हेडफोन (Wireless Headphone) ब्लॅक, रेड आणि ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. Portronics Muffs A ची किंमत 1 हजार 999 रुपये आहे. हे पोर्ट्रोनिक्स आणि अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकते. हा हेडफोन ऑफलाइन स्टोअरमध्येही उपलब्ध आहे. या हेडफोनसोबत 12 महिन्यांची वॉरंटीही उपलब्ध आहे. यामुळे या हेडफोनमध्ये काय विशेष आहे. हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाप लागली असेल. याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डिझाइन आणि बॅटरी

Portronics Muffs A या वायरलेस हेडफोनचा लुक फंकी आहे. तो आरामदायी डिझाइनसह येतो. हेडफोनची रचना अर्गोनॉमिक आहे. हेडफोन्समध्ये मेमरी फोमवर आधारित मऊ आणि काढता येण्याजोगा कान उशी आहे. यात 520mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की ते पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 55 मिनिटे लागतात. हेडफोनमध्ये चार्जिंगसाठी USB-C पोर्ट आहे आणि 30 तासांचा दीर्घ बॅटरी बॅकअप आहे.

हायलाईट्स

  1. Portronics Muffs A ला 40mm ड्रायव्हर्स मिळतात
  2. ब्लूटूथ v5.2
  3. यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक
  4. IPX5 रेटिंग
  5. हेडफोनचे वजन सुमारे 170 ग्रॅम
  6. 520mAh बॅटरी आहे
  7. चार्ज होण्यासाठी फक्त 55 मिनिटे लागतात
  8. चार्जिंगसाठी USB-C पोर्ट
  9. 30 तासांचा दीर्घ बॅटरी बॅकअप

वैशिष्ट्य काय?

Portronics Muffs A ला 40mm ड्रायव्हर्स मिळतात. हे मजबूत BASS आणि ट्रेबल आउटपुट तयार करतात. हेडफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झाल्यास यात ब्लूटूथ v5.2, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे. यात IPX5 रेटिंग आहे, जे हेडफोनचे पाणी, घाम आणि धूळ यांच्यापासून संरक्षण करते. हेडफोनचे वजन सुमारे 170 ग्रॅम आहे.

कंपनीचा दावा आहे की ते पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 55 मिनिटे लागतात. हेडफोनमध्ये चार्जिंगसाठी USB-C पोर्ट आहे आणि 30 तासांचा दीर्घ बॅटरी बॅकअप आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.