आवाजाने उजळणार तुमचे घर, शाओमीचा नवा LED बल्ब

स्मार्ट होम अप्लायन्स विभाग : तब्बल 25,000 तास प्रकाश देऊ शकणारा नवा ‘मी स्मार्ट एलईडी बल्ब (बी 22)’ शाओमीने बाजारात आणला आहे. (Xiaomi Launched new smart LED bulb)

आवाजाने उजळणार तुमचे घर, शाओमीचा नवा LED बल्ब

मुंबई : चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने (Xiaomi) अलीकडेच भारतीय बाजारात दोन नवीन उत्पादने लाँच केली आहेत. या दोन उत्पादनांपैकी एक आहे शाओमीचा खास व्हॉईस-कंट्रोल्ड स्मार्ट बल्ब! याशिवाय फास्ट चार्जिंग देणाऱ्या दोन पॉवर बँकही कंपनीने लाँच केल्या आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा किंमतीत ही उत्पादने बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. (Xiaomi Launched new smart LED bulb)

स्मार्ट होम अप्लायन्स विभागात शाओमीने ‘मी स्मार्ट एलईडी बल्ब (बी 22)’ बाजारात आणला आहे. या बल्बची किंमत 799 रुपये आहे. बल्बमध्ये 16 मिलियन कलर प्रोड्यूस करण्याची क्षमता असून, ‘अलेक्सा’ (Alexa)आणि ‘गुगल असिस्टंट’ने (Google Assistant) देखील हा बल्ब वापरता येऊ शकतो. लाँग-लाइफ असणारा हा बल्ब सध्या शाओमीच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

शाओमीचा हा स्मार्ट बल्ब 9 वॅटचा असून, 950 लुमेन इतका प्रकाश देतो. हा स्मार्ट LED बल्ब तब्बल 25,000 तास प्रकाश देऊ शकतो, असा दावा शाओमी कंपनीने केला आहे. (Xiaomi Launched new smart LED bulb)

या बल्बशिवाय शाओमीने (Xiaomi) दोन पॉवर बँकही लाँच केल्या आहेत. या पॉवर बँक 10,000 एमएएच आणि 20,000 एमएएच क्षमतेच्या आहेत. या दोन्ही पॉवर बँकांमध्ये मायक्रो-यूएसबी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे ड्युअल इनपुटची सुविधा देण्यात आली आहे. 18 वॅट फास्ट चार्जिंग देणाऱ्या या पॉवर बँकेमध्ये 12-लेअर सर्किट प्रोटेक्शन, स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट सारखे फिचर देण्यात आले आहेत. 10,000 एमएएच क्षमतेच्या ‘मी पॉवर बँक आय 3’ची किंमत 899 रुपये आहे. तर, 20,000 एमएएच पॉवर बँकची किंमत 1499 रुपये आहे. सध्या या दोन्ही पॉवर बँक एमआय डॉट कॉम आणि अ‍ॅमेझॉन या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अलीकडेच, शाओमीने स्लाइडिंग फ्लेक्सिबल डिस्प्लेसह नवा फोन पेटंट केला आहे. (Xiaomi Launched new smart LED bulb)

 

संबंधित बातम्या : 

जादूई तंत्रज्ञान, लवकरच रंग बदलणारा फोन बाजारात येण्याची चिन्हं

TikTok | …म्हणून टिकटॉकने हटवले 3.7 कोटी भारतीयांचे व्हिडीओ!

(Xiaomi Launched new smart LED bulb)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI