नव्या फीचर्ससह Xiaomi ‘हा’ लोकप्रिय स्मार्टफोन रिलाँच करणार

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi) आपले विविध स्मार्टफोन अनेक वेळा वेगवेगळ्या नावाने लाँच करत असते.

नव्या फीचर्ससह Xiaomi 'हा' लोकप्रिय स्मार्टफोन रिलाँच करणार
Redmi Note 8
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 7:04 AM

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi) आपले विविध स्मार्टफोन अनेक वेळा वेगवेगळ्या नावाने लाँच करत असते. कंपनीने बर्‍याच वेळा आपल्या आधीच्या डिव्हाइसचे हार्डवेअर बदलून डिव्हाइस नव्याने लाँच केलं आहे. म्हणजेच हे स्मार्टफोन बाजारात नवीन नावाने लाँच (रिलाँच) करण्यात आले आहेत. (Xiaomi plans to re launch Redmi Note 8 with new processor and charging power)

अलीकडेच एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, शाओमी कंपनी त्यांचा 2 वर्षांपूर्वी लाँच केलेला स्मार्टफोन पुन्हा एकदा नव्या फीचर्ससह लाँच करणार आहे. अहवालात असे म्हटले आहे की कंपनी हा फोन रेडमी नोट 8 (Redmi Note 8) या नावाने युरोपियन बाजारात लाँच करणार आहे.

MIUI ट्रान्सलेटर @Kacper Skrzypek यांनी म्हटले आहे की, शाओमी पुन्हा एकदा 2 वर्ष जुना फोन काही बाजारांमध्ये सादर करण्याची तयारी करत आहे. FCC लिस्टिंग पुनरावलोकनानुसार, स्मार्टफोनचं मॉडेल नंबर M1908C3JGG असेल आणि त्याला अधिकृतपणे रेडमी नोट 8 2021 असं नाव दिलं जाणार आहे.

दमदार फीचर्स

हा फोन 2019 मध्ये लाँच करण्यात आलेल्या रेडमी नोट 8 सारखा असणार नाही. नवीन स्मार्टफोनमध्ये गेल्या वर्षी रिलीज झालेला मीडियाटेक हेलियो G85 चिप देण्यात येणार आहे. मात्र आता या फोनची बॅटरी मागील फोनप्रमाणे केवळ 4000mAh इतकीच असेल. हा स्मार्टफोन MIUI 12.5 सिस्टमसह येईल.

रेडमी नोट 8 मध्ये 22.5W चा वेगवान चार्ज सपोर्ट देण्यात येणार असल्याचेही या लीक्समधून समोर आले आहे. म्हणजे, पूर्वीच्या 18W चार्जिंगच्या तुलनेत हा फोन अपग्रेड केला गेला आहे. नवीन स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येईल. फोनचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा असेल. स्टोरेजच्या बाबतीत फोनमध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात येईल.

सर्वप्रथम युरोप-रशियात लाँच होणार

हा फोन कधी लाँच केला जाईल, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु एक बाब निश्चित आहे की, हा फोन युरोप आणि रशियामध्ये सर्वप्रथम लाँच केला जाईल. या फोनच्या इतर फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास या फोनचा फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असेल. हा फोन फिंगरप्रिंट सेन्सर, IR सेन्सर, 3.5 एमएम ऑडिओ जॅक, स्मार्ट पीए, एफएम रेडिओसह येईल.

इतर बातम्या

Infinix चा ट्रिपल धमाका, मोठ्या डिस्प्लेसह तीन दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

1.5 लाखांचा फोन 40 हजारात खरेदीची संधी, ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

Realme च्या ‘या’ 5G स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, 5000mAh बॅटरी, 8GB/128GB सह ढासू फीचर्स

(Xiaomi plans to re launch Redmi Note 8 with new processor and charging power)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.