Redmi Note 11 सिरीजचा पहिला स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज, 5G फोनमध्ये काय आहे खास?

Xiaomi भारतात Redmi Note 11 सिरीजअंतर्गत नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्याचे नाव Redmi Note 11T असू शकते. वास्तविक, Xiaomi ने आपल्या Redmi Note 11 सीरीज अंतर्गत चीनमध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus असे तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

Redmi Note 11 सिरीजचा पहिला स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज, 5G फोनमध्ये काय आहे खास?
Redmi Note 11
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 4:17 PM

मुंबई : Xiaomi भारतात Redmi Note 11 सिरीजअंतर्गत नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्याचे नाव Redmi Note 11T असू शकते. वास्तविक, Xiaomi ने आपल्या Redmi Note 11 सीरीज अंतर्गत चीनमध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus असे तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तसेच, भारतीय बाजारपेठेत कंपनी Redmi Note 11T आणण्याची योजना आखत आहे, जे Redmi Note 11 चे रीब्रँडेंड व्हर्जन असेल. कंपनीने Redmi Note 11 जागतिक स्तरावर Poco M4 Pro 5G म्हणून लॉन्च केला आहे. मात्र, कंपनीने अद्याप लॉन्च डेट जाहीर केलेली नाही. (Xiaomi Redmi Note 11T 5G ready to launch in India, know specs)

Xiaomi Redmi Note 10T भारतात या वर्षाच्या मध्यात लॉन्च करण्यात आला होता, हा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. आता कंपनी आपले अपग्रेड केलेले मॉडेल Redmi Note 11T 5G आणणार आहे. हा मोबाइल फोन मॅट ब्लॅक, स्टारडस्ट व्हाइट आणि एक्वामेरीन ब्लू कलरमध्ये येतो.

Redmi Note 11T 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11T 5G मध्ये 6.6 इंचांचा फुल HD + IPS LCD डिस्प्ले आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, त्याचबरोबर स्क्रोलिंग आणि गेमिंग अनुभव सुधारतो. स्क्रीनवर एक पंच होल कटआउट देण्यात आला आहे, ज्यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयुक्त असेल. तसेच, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे.

Redmi Note 11T 5G चा प्रोसेसर

हा फोन MediaTek Dimension 810 SoC मधून पॉवर घेईल. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरीदेखील असेल. चीनमध्ये लाँच झालेल्या या डिव्हाइसला 8GB पर्यंत RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज मिळेल.

Redmi Note 11T 5G लॉन्च डेट

Redmi Note 11 सीरीजचे सर्व स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होतील याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चीनमध्‍ये लॉन्‍च होणारे हे सर्व डिव्‍हाइसेस सारख्याच फीचर्ससह लाँच होतील की त्यामध्ये काही बदल होतील, हे येणारा काळच सांगेल.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(Xiaomi Redmi Note 11T 5G ready to launch in India, know spec)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.