iPhone होईल Walkie-Talkie! मे महिन्यापर्यंत येईल हे कमाल फीचर

iPhone Walkie-Talkie Feature | तुमचा आयफोन लवकरच Walkie-Talkie होईल. मे महिन्यापर्यंत हे खास फीचर आयफोनमध्ये दाखल होईल. त्यामुळे युझर्सला हे फीचर वापरता येईल. मायक्रोसॉफ्टचे एप लवकरच आयफोनमध्ये येईल. त्याआधारे तुम्हाला आयफोन वॉकी-टॉकीसारखा वापरता येईल.

iPhone होईल Walkie-Talkie! मे महिन्यापर्यंत येईल हे कमाल फीचर
भारताने मोबाईल निर्यातीत मोठी झेप घेतली आहे. भारताने आयफोनच्या निर्यातीत दुपटीने वाढ केली आहे. ट्रेड इंटेलिजन्स अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये भारतातील आयफोनची निर्यात १२.१ अब्ज डॉलरवर पोहोचेल, जी गेल्या वर्षीच्या ६.२७ अब्ज डॉलरच्या तुलनेत दुप्पट आहे.
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 11:57 AM

नवी दिल्ली | 17 March 2024 : तुमचा आयफोन लवकरच Walkie-Talkie होईल. मायक्रोसॉफ्ट Teams ऐप च्या मदतीने हा करिष्मा होईल. आयफोनमध्ये व्हाईस इंटरॅक्शनसाठी एक नवीन फीचर आणण्याची तयारी कंपनीने केली आहे. त्यामुळे iPhone लवकरच वॉकी-टॉकी सारखे काम करेल. एका रिपोर्टनुसार, Microsoft च्या टीम्स ऐपमध्ये आयफोनसाठी वॉकी -टॉकी हे फीचर इंटिग्रेट करण्याची योजना आहे हे फीचर तुम्हाला आयफोनमध्ये मे महिन्यापर्यंत मिळू शकते. त्यामुळे आयफोनधारकांना त्यांचा स्मार्टफोन एखाद्या Walkie-Talkie सारखा वापरता येईल.

अशी मिळेल ही सुविधा

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, या नवीन फीचरमुळे युझर्सला सेफ वॉईस कम्युनिकेशनचा अनुभव घेता येईल. आयफोन युझर्स हे फीचर त्यांचा फोन लॉक असतान पण वापरु शकतील. त्यांना लॉक स्क्रीन असताना पण वॉकी-टॉकीचे फीचर वापरता येईल. या इंटिग्रेशन मे महिन्यात आयफोन धारकांना मिळण्याची दाट शक्यता आहे. अर्थात डेव्हलपर्स त्यासाठी अधिक काळ लागू शकतो, असे सांगत आहे. काही तांत्रिक चुका टाळण्यासाठी काही काळ लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

पुश-टू-टॉकचा वापर

या वॉकी-टॉकी फीचरसाठी मायक्रोसॉफ्ट कंपनी एप्पलच्या पुश-टू-टॉक फ्रेमवर्कचा वापर करणार असल्याचे समोर येत आहे. iOS आणि एंड्रायड प्लेटफॉर्मवर Microsoft Teams साठी जीसीसी क्लाउड इंस्टेंसवर त्याचा सहज वापर करता येईल. आईडी 388486 कडून ओळख पटविण्यासाठी मायक्रोसॉफ्ट 365 रोडमॅपचा नुकताच वापर करण्यात आला होता. हे टीम्सचा वापर वाढण्यासाठी फार मोठे पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी फीचरचा वापर

मायक्रोसॉफ्ट कंपनी नवनवीन फीचरवर काम करत आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर या नवनवीन फीचर्सचा युझर्सला मोठा फायदा होत आहे. मायक्रोसॉफ्ट टीम्सचा वापर हा जास्त करुन मीटिंग अटेंड करण्यासाठी होतो. खासकरुन वर्क फ्रॉम होमसाठी हा पर्याय एकदम बेस्ट मानण्यात येतो. मायक्रोसॉफ्ट टीम्सने वॉकी-टॉकी फीचरचा यापूर्वी पण वापर केला आहे. फ्रंटलाईन वर्कर्ससाठी ऑन फील्डवर त्याचा वापर करण्यात आला होता. आता हेच फीचर आयफोनसाठी वापरण्यात येणार आहे. या मे महिन्यात ते आयफोन युझर्ससाठी उपलब्ध होईल.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.