दारु तस्करांचा हैदोस, PSI ला गाडी रिव्हर्स घेऊन चिरडलं

निलेश डाहाट , TV9 मराठी , चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात गेली चार वर्षे दारुबंदी आहे. या दारुबंदीच्या निर्णयानंतर अनेक भागात अवैधदारु पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत आहे. चंद्रपूर पोलीस दल दारू तस्करी रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारु तस्करी होत आहे. विविध मार्गाने या जिल्ह्यात दारु आणली जात आहे. […]

दारु तस्करांचा हैदोस, PSI ला गाडी रिव्हर्स घेऊन चिरडलं
Follow us
| Updated on: Nov 06, 2018 | 1:37 PM

निलेश डाहाट , TV9 मराठी , चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात गेली चार वर्षे दारुबंदी आहे. या दारुबंदीच्या निर्णयानंतर अनेक भागात अवैधदारु पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत आहे. चंद्रपूर पोलीस दल दारू तस्करी रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारु तस्करी होत आहे.

विविध मार्गाने या जिल्ह्यात दारु आणली जात आहे. दारु तस्करांची हिंमत वाढल्याने पोलीस अधिकाऱ्यांना चिरडण्यापर्यंत मजल गेली आहे. नागभीड तालुका स्थानी असलेल्या ठाण्यातील प्रभारी पोलिस अधिकारी छत्रपतीची चीडे मौशी वळणाजवळ सकाळी 8 च्या सुमारास अवैध दारु संदर्भातील गस्ती मोहिमेवर होते.  वाहनातून अवैध दारू येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार  तैनात असताना त्यांनी संशयित वाहन अडवले.

या वाहनाने इशारा समजून न घेता समोर असलेल्या एका ट्रॅक्टरला धडक दिली. वाहन थांबवण्यासाठी ते स्कॉर्पिओच्या मागे उभे राहिले. तस्कराने गाडी रिव्हर्स घेत छत्रपती चिडे यांना जागीच चिरडले. या घटनेनंतर स्कॉर्पिओ वाहन घेऊन आरोपी पसार झाले.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील साहिल शहजाद नावाचा तस्कर या घटनेत प्रमुख आरोपी आहे.

जखमी अवस्थेतील चिडे यांना तातडीने ब्रह्मपुरीच्या ख्रिस्तानंद  रुणालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

चिडे अत्यंत कठोर अधिकारी होते. त्यांना उत्तम कामगिरीसाठी उत्कृष्ट अधिकारी सन्मान मिळाला होता. जिल्ह्यात अवैध दारु तस्करांची हिंमत वाढल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असून हा अवैध दारू तस्करांच्या दादागिरीचा कळस झाला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी नागभीड येथे रवाना झाले असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.