AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणीने ऑर्डर केली ‘दही पुरी’, आलेले पार्सल पाहून तिला धक्काच बसला…

बंगलुरु येथील एका तरूणीने केलेल्या अनोख्या तक्रारीने सोशल मिडीयावर हंगामा माजला आहे. तरुणीचे म्हणणे आहे की उत्तर भारतीयांच्या मनाला बंगळुरु येथील एका गोष्टीने ठेच पोहचली आहे. त्यामुळे या तरुणीने बंगळुरु सोडण्याची १०१ कारणे दिली आहेत. या कारणीभूत दही पुरी ठरली आहे. काय आहे हे प्रकरण पाहा...

तरुणीने ऑर्डर केली 'दही पुरी', आलेले पार्सल पाहून तिला धक्काच बसला...
| Updated on: Dec 19, 2024 | 5:55 PM
Share

उत्तर भारतीयांचे ‘दही पुरी’ या फेव्हरेट डीशबद्दल खूपच इमोशन जुळलेली असतात. जरा विचार करा तुमच्या एखाद्या आवडत्या डीशबद्दल कोणी छेडछाड केलेली तुम्हाला आवडेल का? असाच काहीसा प्रकार आता बंगळुरु येथे एका तरुणीसोबत झाला आहे. या तरुणीने तेथे  ‘दही पुरी’  या उत्तर भारतीयांसाठी जीव की प्राण असलेल्या डीशची ऑर्डर दिली आणि तिच्या समोर जो पदार्थ वाढला तो पाहून तिला हसावं की रडावं असा सवाल निर्माण झाला. तिने यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट करीत बंगळुरु सोडण्याची १०१ वे कारण….

बंगळुरु शहरात राहणाऱ्या एका उत्तर भारतीय तरुणीने अलिकडे सोशल साईट एक्सवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये तिने दही पुरीमुळे बंगळुरु येथे कसे आपल्या भावनाशी खेळले गेले अशी कैफीयत मांडली आहे. तरुणीने तिला दिलेल्या दही पुरीचा फोटो शेअर करीत मिश्किल शैलीत एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये बंगळुरु सोडण्याचे १०१ कारण असे म्हटले आहे. दही पुरीची ऑर्डर केली तर मला खरोखरच दही आणि पुरी मिळाली आणि ती पाहून माझ्या उत्तर भारतीय मनाला वेदना झाल्या आहेत….!

व्हायरल झालेल्या फोटोत तुम्ही टेबलवर सर्व्ह केलेल्या डीशला पाहू शकता. एका प्लास्टीकच्या पिशवीत काही पानीपुरी म्हणजे गोलगप्पे ठेवले आहेत. तर दही एका डिस्पोजल डब्यात पॅक करुन दिलेले आहे. या पोस्टवर एका युजरने प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की तुम्ही दही – ल्युजनमध्ये आहात, बंगळुरु तुम्हाला तुमच्या स्वप्नातील चाट सर्व्ह कराल ! दुसऱ्या एकाने युजरने लिहीलंय की हे तर तुमचं हृदयभंग केलं आहे तर..

येथे पाहा व्हिडीओ –

अन्य एका युजरने म्हटलेय की मी येथे एका गोलगप्पे वाल्याला एक सुखा पुरी द्यायला सांगितले तर त्याने एक प्लेट सुखा मसाला लपेटून दिली होती. एका युजरने आश्चर्यचकीत होत लिहीलंय की दही पुरी घरात कोणी ऑर्डर करते का ? तुम्हाला खायचे असेल तर तेथे जाऊन खायला हवे ना ! एका युजरने कमेंट केली की दीदी का तो मोय- मोय हो गया…

जर तुम्हाला दही पुरी काय आहे हे माहिती नसेल तर दही पुरी हा एक पॉप्युलर स्ट्रीट फूड आहे. उत्तर भारतीय  नव्हे तर मुंबईकर देखील दही पुरी अगदी आवडीने खातात. तिच्या अनोख्या चवीमुळे दही पुरी खूप प्रसिद्ध आहे. यात उकडलेले बटाटे कुसकरुन टाकलेले असतात. उकलेले वाटाणे, मलाईदार दही आणि कुरकुरीत पुऱ्या त्यात टाकलेल्या असतात. त्यावर काही गोड – तिखट आणि मीठ- चाट मसाला टाकून ही डीश सर्व्ह केली जाते. त्यामुळे दहीपुरी पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते आणि भूक चाळविली जाते.

अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.