AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3BHK घर, 30 लाखांचं पॅकेज… महिलेच्या भावी पतीबाबतची अपेक्षा पाहून लोकांना बसला धक्का

Girl Marriage Wishlist : लग्नासाठी मुलींना त्यांच्या पतीमध्ये काही गुण हवे असतात. पण एका महिलेची गुणवत्ता यादी इतकी मोठी आहे की कदाचित तिच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणं कठीण आहे. तिच्या या विश लिस्टचा स्क्रिनशॉर्ट इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया यूजर्स यावर कमेंट्स करत आहेत.

3BHK घर, 30 लाखांचं पॅकेज... महिलेच्या भावी पतीबाबतची अपेक्षा पाहून लोकांना बसला धक्का
| Updated on: Sep 13, 2024 | 7:03 PM
Share

डिजिटल युग आल्यानंतर आता सर्वकाही ऑनलाईन मिळू लागले आहे. लग्नासाठी आता बऱ्याच डेटिंग साईट पण आल्या आहेत. लोक आता लग्नासाठी जोडीदार देखील ऑनलाईनच शोधत आहेत. वधू-वर शोधत असताना त्या त्यांच्या अपेक्षा देखील त्यामध्ये देत असतात. मुला-मुलींना त्यांच्या भावी जोडीदाराबाबत वेगवेगळ्या अपेक्षा असतात. कोणाला सासू सासरे नको असतात तर कोणाला फ्लॅटमध्येच राहण्याची अट असते.  अशीच एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ३९ वर्षीय महिलेच्या या अपेक्षा पाहून लोकांना धक्का बसलाय.

10 सप्टेंबर रोजी @ShoneeKapoor नावाच्या एका X युजरने वैवाहिक साइटवरून महिलेच्या ‘बायोडाटा’चा स्क्रीनशॉट पोस्ट केला होता, त्यानंतर हे प्रकरण इंटरनेटवर इतरके व्हायरल झाले. ही बातमी लिहिपर्यंत या पोस्टला 15 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच एक हजाराहून अधिक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत.

हा बायोडेटा पाहून लोकं त्या महिलेची खिल्ली उडवत आहेत. शेकडो युजर्सने यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले – ती एक महिला आहे. तिची पदवी काहीही असू शकते. दुसरा म्हणाला – हे त्याचे स्वप्न असू शकते. त्याची उंची 5 फूट आहे, वजन 72 किलो आहे आणि घटस्फोटित आहे. जर तो विवाहित असेल तर कोणी त्याला डेटही करणार नाही. बहुतेक युजरने लिहिले की तिच्या अपेक्षा खूप जास्त आहेत.

महिलेने तिचे वय ३९ वर्षे लिहिले आहे. तिचा घटस्फोट झाला असून ती एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. तिला स्वयंपाक करता येत नाही. परंतु तिला पंत तारांकित हॉटेलमध्ये खायला आवडते. तिचे वार्षिक पॅकेज 1.32 लाख रुपये आहे, म्हणजे अंदाजे 11,000 रुपये ती महिन्याला कमवते. पण तिला लुई व्हिटॉनचे कपडे घालायला आवडतात. याशिवाय जर आई-वडील आपल्या मुलीवर अवलंबून असतील तर ती त्यांना ती लग्नानंतर सोबत ठेवणार आहे.

महिलेला तिच्या भावी पतीमध्ये अनेक गुणांची अपेक्षा आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याचे वय 34 ते 39 वर्षे असावे. तो पूर्णपणे तंदुरुस्त आणि अविवाहित असावा. त्याने अमेरिकेतून एमबीए किंवा एमएचे शिक्षण घेतले असावे. पगार किमान 30 लाख रुपये प्रति वर्ष असावा आणि जर तो एनआरआय असेल तर त्याला वर्षाला किमान 96000 यूएस डॉलर्स मिळत असावेत. याशिवाय त्याच्याकडे स्वतःचे 3BHK घर असले पाहिजे, परंतु त्याच्या पालकांनी त्याच्यासोबत राहू नये.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.