AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 मध्ये पर्वत रांगापासून ते समुद्रापर्यंत, ‘ही’ 6 ठिकाणं प्रवास करण्याऱ्यांसाठी ठरली सर्वोत्तम

पर्वतांचे सौंदर्य आणि समुद्राच्या लाटांनी लोकांना वेड लावले आणि 2025 मध्ये सर्वाधिक पर्यटकांनी या ठिकाणांना भेट दिली. अशा 5 ठिकाणांबद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत...

2025 मध्ये पर्वत रांगापासून ते समुद्रापर्यंत, 'ही' 6 ठिकाणं  प्रवास करण्याऱ्यांसाठी ठरली सर्वोत्तम
Travel Image Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Dec 24, 2025 | 8:28 AM
Share

काही दिवसांतच आपण 2025 या वर्षाला निरोप देणार आहोत आणि हे वर्ष प्रवासप्रेमींसाठी अविश्वसनीयपणे खास ठरले आहे. कारण यावर्षी केवळ प्रवास करण्याची इच्छा नव्हे तर प्रवास करताना फिरण्याची ठिकाणंही बदलेली. अनेकांनी उत्तर भारतातील पर्वत रांगामध्ये निसर्गाच्या सानिध्यात, तर काहीजण हे दक्षिणेकडील समुद्र किनाऱ्यावर शांततेत वेळ घालवत ट्रिप एन्जॉय केली. एवढेच नाही तर या सरत्या वर्षात 2025 मध्ये शिमला ते अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंत या स्थळांनी सर्च इंजिन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दोन्हीवर कब्जा केला. आजच्या लेखात पाच ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे पर्वतांचे सौंदर्य आणि समुद्राच्या लाटांनी लोकांना मोहित केले आणि सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा निर्माण केली.

1. शिमला, हिमाचल प्रदेश

शिमला हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या हिल स्टेशन त्याच्या नितांत सौंदर्य आणि नैसर्गिक दृश्यांसाठी ओळखले जाते. येथे तुम्ही व्हिक्टोरियन शैलीतील इमारती आणि पाइन जंगलांच्या दृश्यांचा अनुभव घेत थंड वाऱ्याचा आनंद घेऊ शकता. मॉल रोड आणि द रिज ही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत.

2. बागा बीच, गोवा

बागा बीच हा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि बारमाही आवडता ठिकाणांपैकी एक बीच आहे. उत्तर गोव्यात स्थित असलेला हा बीच त्याच्या नाईटलाइफ, वॉटर स्पोर्ट्स आणि उत्साही वातावरणासाठी ओळखला जातो. वर्षभर येथे भारतीय आणि परदेशी पर्यटक गर्दी करतात. अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे बागा बीच साहस आणि मनोरंजनाचे परिपूर्ण मिश्रण आहे. येथील सीफूड रेस्टॉरंट्स आणि पार्टी कल्चरमुळे तो वर्षभर लोकप्रिय पर्याय बनतो.

3. मनाली, हिमाचल प्रदेश

मनाली हे हिमाचल प्रदेशातील कुल्लू खोऱ्यात वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. बर्फाच्छादित पर्वत, हिरवीगार जंगले आणि नद्यांनी वेढलेले मनाली हे ठिकाण साहसी खेळांसाठी देखील प्रसिद्ध आहे, जिथे लोक ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगचा आनंद घेतात. बहुतेक लोकं सोलांग व्हॅली, हडिंबा मंदिर आणि रोहतांग पासला भेट देण्यासाठी येथे येतात. आल्हाददायक हवामान आणि सुंदर दृश्यांमुळे मनाली वर्षभर प्रवाशांना आकर्षित करते.

4. राधानगर बीच, अंदमान आणि निकोबार

अंदमान आणि निकोबारमधील राधानगर समुद्रकिनारा त्याच्या शुद्ध पांढऱ्या वाळू आणि निळ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो आणि त्याच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी त्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. शांत वातावरण आणि सुंदर सूर्यास्त आणि सूर्योदय यामुळे 2025 मध्ये येथे मोठ्या संख्येने पर्यटकांनी भेट दिली.

5. धर्मशाला, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा, तिबेटी आणि भारतीय संस्कृतीचे सुंदर मिश्रण येथे पाहायला मिळते. पर्यटक त्सुगलागखांग कॉम्प्लेक्स एक्सप्लोर करतात, त्रिउंडला ट्रेक करतात आणि शहराच्या आध्यात्मिक शांततेचा आनंद घेतात.

6. गोकर्ण बीच, कर्नाटक

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत परिसरामुळे, कर्नाटकातील गोकर्ण बीच एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. किनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण शांतता आणि निसर्गाच्या जवळीकतेचा शोध घेणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करते. कॅम्पिंग, बीच ट्रेकिंग आणि सूर्यास्त आणि सूर्योदय पाहणे लोकप्रिय झाले आहे.

Follow Us
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन