25 वर्षांच्या निस्वार्थ सेवेचे बक्षीस, 3 मजली घर आणि संपूर्ण मालमत्ता वृद्ध महिलेनी केले रिक्षाचालकाच्या नावे

मिनातीच्या इतर कुटुंबीयांनी विचारपूस केली नाही आणि एकटं जगण्यासाठी सोडून दिलं. ती पूर्णपणे एकटी पडली आणि असहाय्य होती. या काळात रिक्षाचालक बुद्ध सामल आणि त्याच्या कुटुंबाने निस्वार्थीपणाने मिनाती पटनायक यांची पूर्ण काळजी घेतली.

25 वर्षांच्या निस्वार्थ सेवेचे बक्षीस, 3 मजली घर आणि संपूर्ण मालमत्ता वृद्ध महिलेनी केले रिक्षाचालकाच्या नावे
मिनाती पटनायक आणि सामल
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 5:41 PM

माणुसकी हा सर्वात मोठा धर्मच नाही तर सर्वात मोठं धनही असतं. याचं जिवंत उदाहरण ओडिसातील कटकमध्ये समोर आलं आहे. गरीब-श्रीमंत, लहान- मोठे असा भेदभाव न करता एका वृद्ध महिलेनी तीचं तीन मजली घर आणि संपूर्ण मालमत्ता एका रिक्षावाल्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. तीच्या मालमत्तेची किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या तीच्या निर्णयावर लोकांनी आश्चर्य आणि कौतुक व्यक्त केले. मात्र, महिलेला तिच्या घरातील सदस्यांचे टोमणे खावे लागतायेत. तरीही वृद्ध महिला आपल्या निर्णयावर ठाम आहे. (63 year old woman in Orissa Cuttack gives all her property to rickshawala)

काय आहे ही कहाणी

मिनाती पटनायक या 63 वर्षीय महिला कटक जिल्ह्यातील सुताहाता भागात राहते. गेल्या वर्षी, पती कृष्णकुमार पटनायक यांच्या निधन झाले. सहा महिन्यांनी मुलगी कोमलचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला. अशा वेळी मिनातीच्या इतर कुटुंबीयांनी विचारपूस केली नाही आणि एकटं जगण्यासाठी सोडून दिलं. ती पूर्णपणे एकटी पडली आणि असहाय्य होती. या काळात रिक्षाचालक बुद्ध सामल आणि त्यांच्या कुटुंबाने निस्वार्थीपणाने मिनाती पटनायक यांची पूर्ण काळजी घेतली. बुद्ध आणि त्याच्या कुटुंबाने मिनातीची हॉस्पिटलपासून घरापर्यंत सगळ्या गोष्टींची काळजी घेतली.

आज तकशी बोलताना मिनाती पटनायक म्हणाल्या की, मला माझी संपूर्ण मालमत्ता एका गरीब कुटुंबाला दान करायची आहे. मी माझी संपूर्ण मालमत्ता रिक्षाचालक बुद्ध सामल यांच्या नावावर कायदेशीररित्या देण्याचे ठरवले आहे. माझ्या मृत्यूनंतर त्याला पैश्यांवरून कोणताही त्रास होऊ नये हा माझा उद्देश आहे. माझ्या बहीणीचा माझ्या निर्णयाला विरोध आहे. मात्र, माझी मुलगी कोमल हिच्या मृत्यूनंतर कुटुंबातील कोणीही माझ्या प्रकृतीची विचारपूस केली नाही. घरातील एकही सदस्य मला भेटायला आला नाही, असं मिनती म्हणाल्या. मात्र, त्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

गेल्या 25 वर्षांपासून रिक्षाचालक कुटुंबासोबत उभा आहे

बुद्ध आणि त्यांचे कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून पटनायक कुटुंबाच्या पाठीशी उभे आहे. बुद्ध म्हणाला की, मी गेल्या 25 वर्षांपासून या कुटुंबाशी जोडलो गेलो आहे. मी पूर्वी घराचे मालक बाबू आणि मुलगी कोमल यांची सेवा करायचो. मी माझ्या रिक्षात फक्त मिनातीजींच्या कुटुंबातील सदस्यांनाच बसवायचो. मिनती मॅडम नेहमी सणवार आणि इतर दिवशी आमची मदत करायच्या. त्यांची सर्व संपत्ती माझ्या नावावर करणे हा त्याचा खानदानीपणा आणि मोठेपणा आहे, असं मी मानतो.

हे ही वाचा-

Dev Uthani Ekadashi 2021| कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर सजलं, सावळ्या विठुरायाला आकर्षक फुलांची सजावट

मतदार यादीमधील नाव नोंदणी, दुरूस्तीसाठी नाशिक जिल्ह्यात विशेष शिबिर अन् ग्रामसभेचे आयोजन

VIDEO : Ajit Pawar | शहाण्या तू आमदार आहेस ना, अजितदादांनी भरसभेत दिल्या रोहित पवारांना कानपिचक्या

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.