Fake Complain: आरा काय! कार चालकाने अंगावर पाणी उडवलं म्हणून पोलिसांत तक्रार, एक एक नग आहेत…

Fake Complain: पण कारचालकाला धडा शिकवण्यासाठी या माणसाने जे काही केले ते ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसू शकतो. प्रत्यक्षात एका कारने या व्यक्तीवर रस्त्यावरचे पाणी उडवले, त्यामुळे तो संतापला आणि चालकाला धडा शिकवण्यासाठी पोलिसांना बोलावले.

Fake Complain: आरा काय! कार चालकाने अंगावर पाणी उडवलं म्हणून पोलिसांत तक्रार, एक एक नग आहेत...
Water Splash On man by carImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 2:08 PM

तुम्ही रस्त्यावरून चालत असाल आणि कारचालकाने (Car Driver) चुकून रस्त्यावरील पाणी तुमच्या अंगावर उडवले तर तुम्ही काय कराल? तुम्हाला गाडीच्या चालकाचा राग येईल किंवा तुम्ही भांडाल. पण कारचालकाला धडा शिकवण्यासाठी या माणसाने जे काही केले ते ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसू शकतो. प्रत्यक्षात एका कारने या व्यक्तीवर रस्त्यावरचे पाणी उडवले (Splashesh Water), त्यामुळे तो संतापला आणि चालकाला धडा शिकवण्यासाठी पोलिसांना (Police)  बोलावले. हे प्रकरण इथेच थांबलं नाही, तर त्याने पोलिसांना एक बनावट गोष्ट सांगितली आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. मात्र तपासात सत्य समोर आल्यावर याच व्यक्तीला अटक करण्यात आली.

त्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली

हे संपूर्ण प्रकरण दिल्लीतील मुंडकाचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी मुंडका पोलीस ठाण्यात पीसीआर कॉल आला होता, ज्यामध्ये फोन करणाऱ्याने सांगितले की, एका कार चालकाने त्याला बंदूक दाखवली आणि तो पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा फोन करणारा गायब होता. ज्याने फोन करून तक्रार केली त्याचा फोन सुद्धा बंद होता.

फोन करणाऱ्याचा फोन बंद होता

पोलिसांनी त्याला फोन केला पण त्याचा फोनही बंद होता. हे प्रकरण शस्त्राशी संबंधित होतं, त्यामुळे पोलिसांनी तपासासाठी एक पथक तयार केलं. पोलिसांनी कारचालक तसेच फोन करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, 23 जुलै रोजी फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव अरविंद असे असून तो सुलेमान नगर येथील रहिवासी होता हे समोर आलं. त्यानंतर या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, तो दुचाकीवरून ऑफिसला जात असताना एका कारने त्याच्यावर रस्त्यावर पाणी उडवले आणि तो निघून गेला. यामुळे त्याला राग आला आणि कारचालकाला धडा शिकवण्यासाठी त्याने पीसीआरला फोन करून पोलिसांना खोटी गोष्ट सांगितली आणि फोन बंद केला.

Non Stop LIVE Update
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.