एकच नंबर! चक्क 50 हजारात Four Wheeler, टाटा-महिंद्रा नाही, महाराष्ट्रातील पठ्ठ्यानं तयार केली भारी कार!

एका अवलियानं चक्क 50 ते 60 हजारातच एक सुपरहिट कार साकारली आहे. जीपचं (Jeep) मिनी वर्जन (Mini Version) वाटावं अशी ही कार आहे. किक मारुन सुरु होणाऱ्या या कारची सगळ्या सर्वत्र चर्चा आहे. कुणी साकारली आहे की सुपरहिट कार आणि काय आहे त्यामागची धारणा?

एकच नंबर! चक्क 50 हजारात Four Wheeler, टाटा-महिंद्रा नाही, महाराष्ट्रातील पठ्ठ्यानं तयार केली भारी कार!
बाईकच्या इंजिनपासून बनवली चक्का कार
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 5:19 PM

जमाना इलेक्ट्रीक कार (Electric car), बटन स्टार्ट व्हेईकल (Button Start) आणि भरभक्कम इंटिरीअर फिचर्स (Advance interior features) असलेल्या सुपर कार्सचा आहे. पण संपूर्ण भारतात या अशा गाड्या (Cars) प्रत्येकालाच परवडतील अशातला भाग नाही. त्यातही ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक स्थिती, तिथली सार्वजनिक वाहतूक (Public Transport) आणि इतर गोष्ट लक्षात घेतल्या तर त्यांना नेमकी कशी कार हवी आहे, याचा विचार करणारं मार्केट आपल्याला अभावानंच पाहायला मिळतं. आता बाजारातील दर्जेदार कार उत्पादक आपल्यासाठी काही करत नाही, म्हणून बोबं मारण्यापेक्षा एका अवलियानं चक्क 50 ते 60 हजारातच एक सुपरहिट कार साकारली आहे. जीपचं (Jeep) मिनी वर्जन (Mini Version) वाटावं अशी ही कार आहे. किक मारुन सुरु होणाऱ्या या कारची सगळ्या सर्वत्र चर्चा आहे. कुणी साकारली आहे की सुपरहिट कार आणि काय आहे त्यामागची धारणा? हे तर जाणून घ्यावंच लागेल!

तुम्ही म्हणाल – ही कार तर महिंद्रा जीपची लहान बहीण वाटतेय ना? सौजन्य – युट्युब/Historicano

कुणी साकारली सुपरहिट कार?

दत्तात्रय विलास लोहार (Dattatray Vilas Lohar). त्यांच्या बोलण्यावरुन तुम्हाला कुठेच त्यांनी इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलंय असं जाणवणार नाही. पण त्यांनी हे काम हे एखाद्या इंजिनियरलाही हे नाव आहे खतरनाक गाडी साकारणाऱ्या एका अवलियाचं. यांनी पॅशन बाईकचं इंजिन वापरुन एक चारचाकी कार साकारली आहे. कारचा लूक भारी व्हावा म्हणून जुन्या गंजलेल्या जीपचं बोनेटचा भाग घेतलंय. त्याला ठाकून-ठोकून, वेल्डिंग करुन आपल्या गरजेप्रमाणे कारचा लूक दिलाय. रिक्षाचे टायर घेऊन ते पुढे लावलेत.. पेट्रोलसाठीचा पंपही बसवलाय. या कारमध्ये इतर सर्सामान्य कारमध्ये जे-जे असतं, ते सगळंकाही आहे. स्टेअरींग (Steering), क्लच (Clutch), ब्रेक (Break), मॅन्युअल गिअर (Manual Gear Box) आणि एक्सलरेटरही (Accelerator) आहे. चार-पाच लोक सहज या कारमधून प्रवास करु शकतील, अशी याची रचना दत्तात्रय लोहार यांनी केली आहे.

‘कितना देती है?’

देवराष्ट्र गावातील असलेल्या लोहार यांनी साकारलेली ही कार एका भारी इंजिनिअरींगा नमुना आहे. आता तुम्ही म्हणाल कार तर भारी बनवली, पण एव्हरेज (Average) किती देते? तर मंडळी या कारचा एव्हरेज सध्याच्या नॅनोपेक्षाही जास्त असल्याचं खुद्द दत्तात्रय यांनी सांगितलंय. एक लीटर पेट्रोलमध्ये तब्बल 40 ते 45 किलोमीटर (Kilometre) इतका भारी एव्हरेज दत्तात्रय लोहार यांची ही सुपरकार देते.

आपल्या कुटुंबासोबत आपणच साकारलेल्या कारमधून ड्राईव्हला जाण्याचा आनंद तुम्हाला दत्तात्रय यांच्या चेहऱ्यावर, त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर साफ साफ दिसून येईल! या भारी इन्व्हेनशनला सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय. अनेकांनी दत्तात्रय यांच्या या इंजिनियरींवर खूश होऊन त्यांचं भरभरून कौतुक केलंय. हिस्टोरीकॅनो नावाच्या एका युट्युब चॅनेलवर 18 डिसेंबरला पहिल्यांदा त्यांचा एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर अनेकांनी दत्तात्रय यांच्या थेट संपर्क साधून त्यांचं कौतुकही केलंय.

इनोव्हेटीव्ह कारचा प्रवासाचा आनंद घेताना चिमुकले प्रवासी  – सौजन्य – युट्युब/Historicano

स्वस्तही आणि मस्तही!

आता या कारची सेफ्टी किती आहे, यावर तज्ज्ञ मंडळी लक्ष वेधू शकतात. वेधायलाही हवं. दरवाजे नसल्यानं ओपन जिप्सी (Gypsy car) किंवा थारसारखा (Mahindra Thar) फिल लोहार यांनी बनवलेल्या या कारमध्ये येते राहिल. पण इतकी स्वस्त आणि मस्त कार खरंच साकारता येऊ शकते, हे लक्षात घेऊन ऑटोमोबाईलमध्ये (Auto-Mobile) जाणकारांनी दत्तात्रय लोहार यांच्या सारख्या बॉर्न टॅलेंटला (Born Talent) वेगळ्या उंचीवरही घेऊन जायला हरकत काय? त्यामुळे स्वस्तातली मस्त कारही बनेल आणि ग्राहकांसाठी ती फायदेशीरही ठरेल!

पाहा कार साकारणाऱ्या दत्तात्रय विलास लोहार यांचा व्हिडीओ –

संबंधित बातम्या –

Ducati ची पहिली इलेक्ट्रिक रेस मोटारसायकल लांचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Mahindra XUV700 खरेदीचा विचार करताय? 1.5 वर्ष वाट पाहावी लागेल

सिंगल चार्जवर 1000 किमी रेंज, Tesla ला टक्कर देण्यासाठी नवी इलेक्ट्रिक सेडान सज्ज

5 लाखांहून कमी किंमतीत घरी आणा सेकेंड हँड SUV, Mahindra Thar सह अनेक पर्याय उपलब्ध

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.