५०० किलो वजनाची व्यक्ती एअर पोर्टवर पोहचली, बोर्डिंगसाठी वापरली क्रेन video viral
तुम्ही प्रवासासाठी बुकींग केले असेल तर तुम्हाला प्रवास करायला देणे संबंधित संस्थेची जबाबदारी असते. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका क्रेनद्वारे एका प्रवाशाला विमानात बसवण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सतत वेगवेगळ कंटेन्ट पाहायला मिळतात. अनेक व्हिडीओ आणि रिल्स एकदम मनोरंजक असतात. काही व्हिडीओत इतके धक्कदायक असतात की तुम्ही ते पाहून विचार करायला लागता. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसत आहे.तुम्ही असा व्हिडीओ नक्कीच याआधी पाहिला नसेल…
आपण सर्वजण प्रवास करत असतो. अशावेळी वेगवेगळ्या लोकांसोबत प्रवास करत असतो. अनेकदा आजार व्यक्ती प्रवास करत असतात.त्यांना स्पेशल व्हिलचेअर सारख्या साधनांचा वापर करावा लागतो. परंतू तुम्ही कधी असा प्रवासी पाहिला आहे का की त्याला विमानात चढवण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला असेल. असाच एक हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.त्यात एका व्यक्तीला विमानात बसवण्यासाठी चक्क क्रेनचा वापर करावा लागला आहे. या व्यक्तीचे वजन इतके जास्त आहे की व्यक्ती स्वत:हून चालत जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याला विमानात बसवण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला आहे.
येथे पोस्ट पाहा –
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा नजारा एका एअरपोर्टचा आहे. येथे विमानतळावर विमान उड्डाणासाठी सज्ज आहे आणि प्रवासी विमानात बसत आहेत. या दरम्यान एका प्रचंड वजनाच्या महालठ्ठ माणसाला क्रेनवर उभे केले जात आहे. त्याचे वजन इतके जादा आहे की त्याला स्वत:ला जिने चढता येत नाहीएत. त्यामुळे त्याला क्रेनद्वारे उचलून विमानात बसवले जात आहे. त्याची निगराणी करण्यासाठी तेथे खूपसारे लोक उभे आहेत. या प्रवाशाला नीट विमानात जाता यावे यासाठी सर्व काळजी घेत आहेत.
या व्हिडीओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर jesters_ai नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केले आहे. या व्हिडीओला तीन दिवसात ३३ हजाराहून अधिक लोकांनी पसंद केले आहे.या व्हिडीओवर अनेक कमेंट देखील आल्या आहेत. वास्तविक हा व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार केलेला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की हा व्हिडीओ कोणाची थट्टा किंवा चिडवण्यासाठी तयार केलेले नाही. केवळ क्रिएटीव्ह उद्देश्याने हा व्हिडीओ तयार केलेला आहे.
