चक्क एका स्कूटीवर पाच जणं, जीवघेण्या स्टंटचा Video Viral पाहून वाढेल धाकधूक

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका स्कूटीवरुन पाच जणं प्रवास करत असल्याचे दिसत आहे. हा जीवघेणा स्टंट पाहून तुमचीही धाकधूक वाढेल.

चक्क एका स्कूटीवर पाच जणं, जीवघेण्या स्टंटचा Video Viral पाहून वाढेल धाकधूक
Scooty Stunt
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 30, 2025 | 2:10 PM

इंटरनेटवर दररोज काही तरी नवीन व्हायरल होत असते. कधी मजेशीर व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेतात तर कधी काही व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका स्कूटीवरुन पाच तरुण प्रवास करत असल्याचे दिसत आहे. पण त्यांचा हा जीवघेणा स्टंट पाहून धाकधाकू वाढते. कारण चार तरुण हे सीटवर बसलेले आहेत तर पाचवा तरुण ज्या प्रकारे प्रवास करत आहे तुम्हालाही भीती वाटेल.

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ ज्याने ज्याने पाहिला, तो थक्क झाला आहे. कारण व्हिडीओमध्ये एका स्कूटीवरून पाच तरुण प्रवास करत आहेत. चार तरुण सीटवर बसलेले आहेत. तर पाचव्या तरुणाला त्यांनी डोक्यावर घेतले आहे. जणूकाही तो पाचवा तरुण सुपरमॅनसारखा हवेत प्रवास करत आहे. या मुलांनी केलेला हा जीवघेणा स्टंट पाहून सर्वांना धक्का बसला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही रस्त्यावर चालणाऱ्या इतर लोकांसाठीही हा धोका आहे.

वाचा: नणंदेसोबत बायकोचे रोमँटिक चॅट, नवऱ्याला समजताच… 7 वर्षांचे नात्यात नको ते घडलं

समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ छत्तीसगडमधील बीजापूरचा आहे. 18 सेकंदांच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये दिसत आहे की, एकाच स्कूटीवर चार मुलं सीटवर बसले आहेत आणि पाचवा मुलगा त्यांच्या खांद्यावर वर अर्धा हवेत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की पाच जाणांपैकी एकानेही हेल्मेट घातलेले नाही. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, जेव्हा व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती मजेत त्यांच्या या कृतीला ‘खूप छान, एक नंबर’ म्हणते, तेव्हा सुरुवातीला सर्व मुलं घाबरून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतात. पण प्रशंसा ऐकून ‘थँक यू भैया’ म्हणत दुसऱ्या रस्त्यावरुन पळू जातात

नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

X (पूर्वी ट्विटर) हँडल @Ilyas_SK_31 वरून इलियास नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, हे धोकादायक वर्तन सर्वसामान्य लोकांच्या जीवासाठी धोकादायक आहे असे कॅप्शन दिले आहे. युजरने छत्तीसगड आणि बीजापूर पोलिसांना टॅग करत तात्काळ तपास आणि कारवाईची मागणी केली आहे. एक युजरने या व्हिडीओवर कमेंट करत, सुरुवातीला वाटलं की कोणीतरी प्रेत उचलून नेत आहे असे म्हटले. तर दुसऱ्याने, रील बनवण्याच्या नादात आता हे रेलवर जातील अशी कमेंट केली आहे. आणखी एका युजरने लिहिले की, अशा उद्दाम लोकांविरुद्ध कठोर कारवाई व्हायला हवी. छत्तीसगड पोलिसांकडून अद्याप कोणतेही निवेदन आलेले नाही, पण कमेंट सेक्शनमध्ये लोक सातत्याने कारवाईची मागणी करत आहेत.