Video: बाइकवर रोमान्स! पोलिसांनी देखील घेतली रिलची मजा, फाडलेल्या चलनाची रक्कम ऐकाल तर हसावं की रडावं कळणारही नाही
Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रेमी जोडपे चालत्या बाइकवर फिल्मी स्टाईलमध्ये रोमँटिक होताना दिसत आहे. पण हा रोमॅन्स त्यांना खूप महागात पडला. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया...

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. अनेक तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात रिल्स बनवताना दिसतात. मग ते रिल्स बनवण्यासाठी जीव धोक्यातही टाकतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये एक जोडपे चालत्या बाइकवर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. या व्हिडीओने केवळ लोकांचे लक्षच वेधले नाही, तर ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करण्याबाबत प्रश्नही उपस्थित केले आहेत. एका ट्राफिक पोलिसाने या कपलला पाहिले. त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हालाही काय प्रतिक्रिया द्यावी हे कळणार नाही.
काय आहे व्हिडीओ?
उत्तर प्रदेशच्या नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील कपलवर कठोर कारवाई केली आहे. त्या तरुणावर मोठा दंड ठोठावला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक तरुण आणि एक मुलगी बाइकवर स्वार असल्याचे दिसते. तरुणाने पांढरा शर्ट आणि काळी पँट घातली आहे, तर मुलगी तरुणाच्या बाइकच्या टँकवर बसली आहे. तिने त्याला मिठी मारली आहे. असे करताना दोघांनाही अजिबात लाज वाटली नाही. हे दृश्य लोकांनी त्यांच्या मोबाइल फोनवर रेकॉर्ड केले आणि हे स्पष्ट आहे की दोघेही ट्रॅफिक नियमांची पायमल्ली करत आहेत. दोघांना पाहून असे वाटते की जणू ते स्वतःला एखाद्या चित्रपटातील सुपरस्टार समजत आहेत.
Action-Reaction kinda Kalesh pic.twitter.com/TDndmTk4vp
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 24, 2025
बाइकवर रोमँस करण्याची मोजावी लागली मोठी किंमत
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि तरुणावर अनेक ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनाचा आरोप केला. पोलिसांनी सांगितले की, तरुणाने केवळ रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन केले नाही, तर स्वतःच्या आणि मुलीच्या जीवाला धोका देखील निर्माण केला. पोलिसांनी तरुणावर ठोठावलेल्या दंडात अनेक कलमांचा उल्लेख केला, ज्यामध्ये धोकादायक वाहन चालवणे, हेल्मेट न घालता बाइक चालवणे आणि ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन यांचा समावेश आहे. दंडाची रक्कम 53,500 रुपये निश्चित करण्यात आली, जो ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनासाठी एक मोठा दंड आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनीही या दोघांवर संताप व्यक्त केला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. एका यूजरने खूप छान अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘या अॅक्शनवर पोलिसांनी चांगलीच रिअॅक्शन दिली आहे’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘पोलिसांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे’ असे म्हटले आहे.
