Anand Mahindra : “तर मला कामावरून काढून टाकतील….”, आनंद महिंद्रा असं का म्हणाले?

"मी जर यांचं उत्तर दिलं तर मला नोकरीवरून काढून टाकलं जाईल. पण इतकं सांगू शकतो की मीही तुमच्याइतकाच या लॉन्चसाठी उत्सुक आहे." आनंद महिंद्रा यांच्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा आहे.

Anand Mahindra : तर मला कामावरून काढून टाकतील...., आनंद महिंद्रा असं का म्हणाले?
आनंद महिंद्रा
आयेशा सय्यद

|

May 07, 2022 | 9:49 AM

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. विविध गोष्टींवर ते आपली मतं उघडपणे मांडताना दिसतात. त्यांच्या मतांची जोरदार चर्चा होते. आताही त्यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा आहे. ते ट्विट आहे त्यांनी एका नेटकऱ्याला दिलेल्या उत्तराचं… आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा स्कॉर्पिओच्या (Mahindra Scorpio) लॉन्चशी संबंधित एक ट्वीट केलं. एका ट्विटर नेटकऱ्याने आनंद महिंद्राला विचारलं की “मला सांगा स्कॉर्पिओ कधी लॉन्च होणार आहे? आम्ही त्याची वाट पाहत आहोत.” त्यावर आनंद महिंद्रा यांनी जे उत्तर दिलं त्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

आनंद महिंद्रा यांचं उत्तर

या नेटकऱ्याचं ट्विट रिट्विट करत आनंद महिंद्रा यांनी त्याला उत्तर दिलं. ते म्हणाले की “मी जर यांचं उत्तर दिलं तर मला नोकरीवरून काढून टाकलं जाईल. पण इतकं सांगू शकतो की मीही तुमच्याइतकाच या लॉन्चसाठी उत्सुक आहे.” आनंद महिंद्रा यांच्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा आहे. आनंद महिंद्रा यांचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रा यांच्या उत्तरानंतर काही वेळातच महिंद्र स्कॉर्पिओचा टीझर लाँच करण्यात आला. या टीझरला बिग बी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.

सोशल मीडियावर सक्रिय

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या कंपनीची नवीन धोरणं, ऑटो जगतातील नवीन मॉडेल्सचं लाँचिंग आणि क्रीडा जगताशी संबंधित अनेक गोष्टींबाबत ते ट्विटरवर सक्रिय असतात. ट्विटरवर त्याचे 9.1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांना क्रिकेट आणि फुटबॉलची आवड आहे. यासोबतच त्यांना भारतातील प्रो कबड्डी लीगचे शिल्पकार देखील म्हटलं जातं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें