Viral : आनंद महिंद्रांनी अनोख्या पद्धतीनं ख्रिसमसच्या शुभेच्छा देत व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले…

Viral : आनंद महिंद्रांनी अनोख्या पद्धतीनं ख्रिसमसच्या शुभेच्छा देत व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले...
व्हायरल

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मुलांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये मुलांनी जुगाड करून पार्टी तयार केलीय आणि ते सर्वजण विश यू अ मेरी ख्रिसमसच्या धूनवर नाचताना आणि गाताना दिसत आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 25, 2021 | 5:52 PM

आज 25 डिसेंबर… जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शनिवारी जगभरात ख्रिसमसचा सण साजरा होत आहे. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि आपापल्या शैलीत या सणाचा आनंद घेतात. बरेच लोक याला मोठ्या दिवसाच्या नावानंदेखील ओळखतात. अशा परिस्थितीत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मुलांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये मुलांनी जुगाड करून पार्टी तयार केलीय आणि ते सर्वजण विश यू अ मेरी ख्रिसमसच्या धूनवर नाचताना आणि गाताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, की काही मुलांनी एक वर्तुळ तयार केल्याचं दिसतं. या सर्वांनी बनवलेली वाद्ये टांगली आहेत. व्हिडिओमधील मुलांमध्ये तात्पुरत्या वस्तू जसे की बादल्या, लाकडाचे तुकडे, तसंच यापुढे वापरता येणार नाहीत, अशा वस्तूंचा समावेश आहे. हा व्हिडिओ आपल्याला एक संदेश देतो, की प्रत्येक परिस्थितीची सकारात्मक बाजू पाहिल्यास, आशावादी राहिल्यास आणि आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतल्यास आपण खूप आनंदी होऊ शकतो.

व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘एक व्हिडिओ लाखो शब्दांचा आहे. हॅपीनेस फॅक्टरीला भांडवल लागत नाही. तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा.” या व्हिडिओला ७२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर मुलांचा सहभाग आणि मेहनत लोकांना खूप आवडलीय. याच कारणामुळे अनेक युझर्सनी त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या. एका युझरनं लिहिलं, की ‘अग्नीपाखरांनी रात्र उजाळा, सूर्याचा मार्ग दिसला तर समुद्र होईल.’ तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, की पैशानं आनंद विकत घेता येत नाही.

VIRAL : हातगाडीच्या वर कुत्र्यासाठी बांधलं छोटंसं ‘घर’, आयपीएस अधिकाऱ्यानं शेअर केला फोटो

VIDEO : व्हायरल व्हिडिओमधल्या या ट्रेनला आग नाही लागली, तर सजवलंय! UKमधला व्हिडिओ होतोय व्हायरल

VIDEO : सायकलवरच लावलं ब्लेंडर! ज्यूस करण्याचं अफलातून जुगाड; सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ पाहाच

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें