AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : ‘तुमचं नाक ऑक्सिजन सिलेंडर तर दोन हात हे नर्स’, रामदेव बाबांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) कोरोना संकट काळातही वारंवार चर्चेत येत आहेत (Baba Ramdev Viral Video telling about oxygen)

VIDEO : 'तुमचं नाक ऑक्सिजन सिलेंडर तर दोन हात हे नर्स', रामदेव बाबांचा व्हिडीओ तुफान व्हायरल
बाबा रामदेव
| Updated on: May 08, 2021 | 5:08 PM
Share

मुंबई : योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) कोरोना संकट काळातही वारंवार चर्चेत येत आहेत. कधी ते कोरोनावर तयार करण्यात आलेल्या कोरोनिल औषधासाठी तर कधी कोरोना किट मार्केटमध्ये लॉन्च केल्यामुळे चर्चेत आले. आता ते त्यांच्या ऑक्सिजन बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा संबंधित वक्तव्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अनकेजण हा व्हिडीओ शेअर करुन रामदेव बाबांची टिंगल करत आहेत. कारण या व्हिडीओत बाबा रामदेव तुमचं नाक हेच एक ऑक्सिजन सिलेंडर आहे. तर दोन हात हे नर्स आहेत, असं म्हणताना दिसत आहेत (Baba Ramdev Viral Video telling about oxygen).

‘योगा केल्याने शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण नियंत्रणात राहतं’

योगा केल्याने शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण नियंत्रणात राहतं, असा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. याशिवाय ऑक्सिजनबाबत लोक उगाच नकारात्मक वातावरण तयार करत आहेत, असंही ते व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ हा ‘आस्था’ या टेलिव्हिजन चॅनलवरचा आहे. या चॅनलवर रामदेव बाबा यांचा रोज पहाटे योगाचा कार्यक्रम प्रक्षेपित केला जातो. यावेळी रामदेव बाबा तिथे उपस्थित असलेल्या अनेकांना योगाचे महत्त्व पटवून देतात. अशाच प्रकारचं महत्त्व पटवून देत असताना रामदेव बाबा ऑक्सिजनबाबत बोलले, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रामदेव बाबा नेमकं काय म्हणाले?

“तुम्ही बाहेर ऑक्सिजन सिलेंडर शोधत आहात. पण तुमच्या जवळच ऑक्सिजन सिलेंडर आहे. आपलं नाक हेच ऑक्सिजन सिलेंडर आहे. तर दोन हात हे नर्स आहेत. त्याने भरा ऑक्सिजन, ज्यांना ऑक्सिजनची कमी पडेल तर सांगा”, असं रामदेव बाबा व्हिडीओत आत्मविश्वासाने सांगत आहेत.

“ज्यांचं 70 ते 80 पर्यंत ऑक्सिजन लेव्हल आलं होतं, त्यांच्यांकडून मी तासभर योगा करुन त्यांची ऑक्सिजनची लेव्हल 98 ते 100 पर्यंत आणली. धैर्य तर ठेव! मेलो बाबा, ऑक्सिजन बेड मिळत नाही. औषध, स्माशान अपुरी पडली. सगळीकडे तेच सुरु आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

ट्विटरवर #Ramdev ट्रेंडमध्ये

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओच्या निमित्ताने अनेकडजण रामदेव बाबा यांना ट्रोल करत आहेत. काही लोकांनी तर ऑक्सिजन अभावी जीव गमावणाऱ्या रुग्णांची रामदेव बाबा टिंगल करत आहेत, असा आरोपच केला आहे. सोशल मीडियावर #Ramdev ट्रेंडमध्ये आहे. अनेकजण या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत (Baba Ramdev Viral Video telling about oxygen).

रामदेव बाबा यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ बघा

हेही वाचा : Sana Ramchand | पाकिस्तानातील पहिली हिंदू तरुणी, असिस्टंट कमिश्नर बनली, सना रामचंदचा सर्वांना अभिमान

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.