Baba Vanga Prediction 2026 : ही संकटं दारात! अजून कसोटी लागणार, बाबा वेंगाची ती खतरनाक भविष्यवाणी
Baba Vanga Prediction Drought : महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात अतिवृष्टीने कहर दाखवला. जगात काही भागात भूंकप होत आहे. पुढील वर्ष तर मानवाची कसोटी पाहणारे असेल, काय केलं बाबा वेंगानं ते मोठं भाकीत?

महाराष्ट्रासह भारतात पावसाने मोगलाई माजवली आहे. अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. तर काही देशांमध्ये भूंकपाचे हादरे बसले आहेत. भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिने तर पुढील वर्षांसाठी अजून खतरनाक भविष्यवाणी केली आहे. 1996 मध्ये मृत्यूपूर्वी तिने 5079 वर्षापर्यंत भविष्यवाणी केलेली आहे. तिचे भाकीत गूढ काव्यात रचलेले होते. त्यातील काही काव्य गहाळ झालेले आहे. आता सोशल मीडियावर बाबा वेंगाची 2026 मधील भविष्यवाणीची चर्चा सुरू आहे. पुढील वर्ष मानवासाठी कसं असेल, त्यात काय संकटं येतील. मानव काय प्रगती करेल. कशाचा शोध लागेल अशा अनेक बाबींची उत्सुकता आहे. त्याविषयी काय आहे भाकीत?
भूकबळीचे संकट दूर
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, वर्ष 2026-28 या दरम्यान जगाची मोठी समस्या दूर होईल. या काळात भूकबळीची समस्या दूर होईल. जगभरात अन्नधान्याचा मोठा साठा असेल. शेजारील चीन आर्थिक आणि सैन्य शक्तीत अमेरिकेवर वरचढ ठरेल. विज्ञान आणि संशोधनात मानव मोठा पल्ला गाठेल. याशिवाय येत्या काही वर्षात तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल.
2026 मध्ये तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल. जगातील बड्या राष्ट्रांमध्ये तणाव वाढेल. चीन, तैवानला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करेल. पण त्याला यश येणार नाही. पुढील वर्षी रशिया आणि अमेरिकेत थेट संघर्ष होऊन तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल, असे भाकीत बाबा वेंगाने केले आहे. कुर्स्क येथील आण्विक पाणबुडी संकट, आयसिस दहशतवादी संघटनेचा उदय, सीरियावरील गॅस हल्ला, ब्रेक्झिट, 9/11 दहशतवादी हल्ला आणि राजकुमारी डायनाचा मृत्यू या वेंगाच्या भविष्यावाण्या खऱ्या ठरल्या आहेत.
भारतासाठी काय भविष्यवाणी
भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिने भारतासाठी संकटांची मालिका वाचली आहे. नैसर्गिक आपत्ती या काळात भारतावर येईल असे भाकीत तिने वर्तवले आहे. पुढील वर्षात भारतात महापूर, जमीन खचणे, तापमानात कमाल वाढ अशा संकटांची मालिका दिसेल असे तिने भाकीत केले आहे. तर भारतातील अनेक शहरात पाणी कपातीचे संकट असेल असे या भाकितात म्हटले आहे. त्यामुळे राजकीय ताणतणाव वाढतील.
सूचना : शास्त्रज्ञ बाबा वेंगाची भाकीतं मानत नाहीत. हे सर्व दावे खोटे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. बाबा वेंगा हिची भाकीतं ही काव्यात्म आहे आणि ती फारशी लिखित नाहीत. विशेष म्हणजे ती एखाद्या प्रदेशाचं, देशाचं नाव घेऊन केलेली नाही तर या काळात अशा घटना घडू शकतात असा तिचा दावा आहे, त्यामुळे एखाद्या ठिकाणी तशी घटना जुळून येऊ शकतात. त्यामुळे शास्त्रज्ञ तिच्या भविष्यवाणीकडे लक्ष देत नाहीत.
