AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पृथ्वीवर आता कोणते नवीन संकट येणार? बाबा वेंगाची ती धडकी भरवणारी भविष्यवाणी, जगभरात दिसेल परिणाम

Baba Vanga Prediction : भविष्यवेत्ती बाबा वेंगाची अनेक भाकीत सध्या समोर येत आहे. त्यात यावर्षासाठी 2025 साठी तिने एक मोठे भाकीत नोंदवले आहे. त्यानुसार, हे मोठे संकट पृथ्वीवर येऊ पाहत आहे, कोणते आहे ते संकट?

पृथ्वीवर आता कोणते नवीन संकट येणार? बाबा वेंगाची ती धडकी भरवणारी भविष्यवाणी, जगभरात दिसेल परिणाम
बाबा वेंगाचे भाकीतImage Credit source: गुगल
| Updated on: May 27, 2025 | 3:50 PM
Share

बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा ही तिच्या अनेक भविष्यवाण्यांसाठी ओळखली जाते. त्यातील काही तर एकदम भयावह आहेत. आता बाबा वेंगा हिने या वर्षासाठी 2025 साठी अशीच एक धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे. जागतिक घडामोडी पाहता तिची ही भविष्यवाणी खरी होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. बाबा वेंगाने जगात आर्थिक मंदी येण्याची भीती तिच्या गूढ काव्यात केल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्यापारी धोरणं ही जगासाठी अहितकारक असल्याचे दिसून येते. तर युद्ध परिस्थितीमुळे सुद्धा अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. काय आहे बाबा वेंगाचा तो दावा?

यावर्षात कोणते संकट येणार?

Baba Vanga हिच्या भाकितानुसार, असे वर्ष पण येणार आहे, जे सर्वांसाठी अत्यंत कठीण असेल. त्यामध्ये मोठे आर्थिक संकट दिसून येईल. हे वर्षे 2025 असू शकते. यामध्ये आर्थिक संकट दिसू शकते. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, यावर्षी जागतिक बाजारात अनेक धोरणं बिघडतील. त्यामुळे जगातील अनेक देशात तणाव वाढेल. जगात मोठी उलथापालथ होईल. सध्याचा विचार करता अमेरिकेच्या धोरणांचा थेट परिणाम दिसून येत आहे.

आर्थिक मंदी

सध्या जगभरातील बाजारात मोठी उलथापालथ दिसून येत आहे. त्याला बाबा वेंगाच्या भाकि‍ताशी जोडून पाहण्यात येत आहे. असे मानण्यात येत आहे की, 2025 मध्ये जगभरात आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक बड्या बँकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. अनेक देशांना गंभीर आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल. काही देशात महागाईचा विस्फोट होईल आणि ते शेजारील देशात आश्रयाला जातील. त्यामुळे त्या देशावर सुद्धा आर्थिक ताण येईल. यातून गरजांसाठी माणूस वापरला जाईल. माणसाच्या पतनास या वर्षापासून सुरुवात होणार असल्याचे भाकीत तिने वर्तवले आहे.

डिस्क्लेमर : बाबा वेंगा हिची भाकीत गूढ आहेत. ही उपलब्ध स्त्रोतावरील माहिती आहे. टीव्ही 9 मराठी याविषयीचा कोणताही अधिकृत दुजोरा देत नाही

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....