AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : ‘छोट्या डोळ्यांचे गणपती बाप्पा सुद्धा परदेशातून…’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा तरी काय? तो धोका तरी काय?

देशाला वाचवायचे असेल, पुढे न्यायचे असेल तर ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी केवळ सैनिकांवर नाही तर 140 कोटी जनतेची सुद्धा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी भारतीयांनी एक मोठा इशारा दिला. काय आहे तो धोका?

PM Narendra Modi : 'छोट्या डोळ्यांचे गणपती बाप्पा सुद्धा परदेशातून...', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा तरी काय? तो धोका तरी काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 27, 2025 | 3:09 PM
Share

Foreign Goods : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा सांगितली. भारताला पुढे न्यायचे असेल, देशाचे संरक्षण करायचे असेल, प्रगतीपथावर न्यायाचे असेल तर ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी केवळ सैनिकांवर नाही तर 140 कोटी जनतेची सुद्धा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी भारतीयांनी एक मोठा इशारा दिला. काय आहे तो धोका?

बारीक डोळ्यांचे गणपती बाप्पा

2047 पर्यंत भारताला विकसीत करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था लागलीच तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आपण कोणतेही परदेशी वस्तू खरेदी करू नये असे आवाहन पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी केले. गावा गावातील व्यापाऱ्यांनी शपथ घ्यावी की, परदेशी मालातून किती पण नफा होत असला तरी ते परदेशी वस्तू विकणार नाहीत. आजकाल छोट्या डोळ्यांचे गणपती बाप्पा पण परदेशातून येत आहेत. या गणपतीचे डोळे सुद्धा उघडे नाहीत. होळीचे रंग आणि पिचकारीपर्यंत सर्व वस्तू परदेशातून आयात होत आहे. हा धोका ओळखण्याचे आवाहन त्यांनी केले.

अमेरिका-चीनवर साधला निशाणा

गांधीनगर येथील कार्यक्रमात मोदी यांनी नागिरकांना आवाहन केले की, त्यांनी परदेशी वस्तूचा वापर करू नये. त्यांनी नाव न घेता अमेरिका आणि चीनला कडक इशारा दिला. ऑपरेशन सिंदूर हे व्यापक असल्याचा संदेशच जणू त्यांनी दिला. ऑपरेशन सिंदूर ला सैन्यबळासह लोकशक्तीची पण गरज असल्याचे पीएम मोदी म्हणाले. त्यांनी परदेशी माल खरेदी न करण्याचे आवाहन केले.

मेड इन इंडियाचा अभिमान बाळगा

तुमच्याकडे ज्या परदेशी वस्तू आहेत, त्या फेकण्यास आपण सांगत नाही. पण वोकल फॉर लोकल साठी तुम्ही नवीन परदेशी उत्पादने वापरू नका. एक दोन टक्केच अशा वस्तू आहेत, ज्या तुम्हाला बाहेरून आणाव्या लागतील. त्या आपल्याकडे उपलब्ध नसतील. आज भारतात अनेक वस्तू तयार होत आहेत. आपल्याला मेड इन इंडिया ब्रँडचा अभिमान असायला हवा असे आवाहन त्यांनी केले. ऑपरेशन सिंदूरसाठी सैन्यबळासह लोकशक्तीची पण गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.