AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badal Barsa Bijuli गाण्यावरचा आजवरचा सगळ्यात बेस्ट व्हिडीओ, चिमुकल्याच्या स्टेप्स मध्ये जादू!

Badal Barsa Bijuli ऐकून-ऐकून कंटाळा आला होता नाही का? पण मध्यंतरी हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं, इतकं व्हायरल की जो तो या गाण्यावर डान्सच करत होता. मुलांनी सुद्धा हे गाणं सोडलं नव्हतं. ग्रुपच्या ग्रुप्स यावर डान्स करत होते. जरासा ट्रेंड कमी काय झाला, याचा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओ मध्ये एक चिमुकला डान्स करतोय. हा व्हिडीओ तुम्हाला खूप आवडेल.

Badal Barsa Bijuli गाण्यावरचा आजवरचा सगळ्यात बेस्ट व्हिडीओ, चिमुकल्याच्या स्टेप्स मध्ये जादू!
badal barsa bijuliImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 15, 2023 | 1:10 PM
Share

मुंबई: सोशल मीडियावर जर लोकांना एखाद्या गाण्याचं वेड लागलं की तेच गाणं बराच वेळ चालतं आणि त्याचा ट्रेंड येतो. सध्या “आमच्या पपांनी गणपती आणला” हेच गाणं सगळीकडे ऐकू येतंय. जो तो उठतोय याच गाण्यावर व्हिडीओ करतोय. या गाण्यांच्या वादळात मध्यंतरी असंच एक गाणं व्हायरल झालं होतं, “बादल बरसा बिजुली”! आठवलं? या गाण्याचं लोकांना अक्षरशः वेड लागलं होतं. अहो कधी नाही ते मुलांचा ग्रुप सुद्धा या गाण्यावर थिरकत होता. सोशल मीडिया युजर्सला तर नंतर-नंतर हे गाणं ऐकून कंटाळा आला होता. या , “बादल बरसा बिजुली” वर अनेकांचे प्रयोग करून झाले. आपल्यालाही वेगवेगळे प्रकार पाहायला मिळाले. पण तुम्हाला माहितेय का “बादल बरसा बिजुली” चा सगळ्यात बेस्ट व्हिडीओ कोणता आहे? हा व्हिडीओ बघा, हा प्रचंड व्हायरल होतोय.

“बादल बरसा बिजुली”

एक गोंडस मुलगा शाळेच्या गॅदरिंग मध्ये त्याच्या “बादल बरसा बिजुली” या आवडत्या गाण्यावर नाचताना दिसतोय. या मुलाने शाळेचा गणवेश घातलाय. हा मुलगा या गाण्याचा चांगलाच आनंद घेतोय. त्याला बघून प्रत्येकालाच या गाण्यावर नाचायची इच्छा होईल अशा पद्धतीने तो छान एन्जॉय करतोय. “बादल बरसा बिजुली” चा बहुधा हा सगळ्यात भारी व्हिडीओ असावा. तो नाचत असताना खाली उभे असणारे विद्यार्थी सुद्धा याची मस्त मजा घेतायत.

मुलींच्या डान्सच्या स्टेप्स कॉपी

duskndawn.xo या इंस्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये या गोंडस मुलाला त्याचे शिक्षक सुद्धा प्रोत्साहन देताना दिसतायत. या गाण्याचा व्हिडीओ खरं तर तेव्हा फेमस झाला होता जेव्हा दोन सुंदर मुलींनी यावर डान्स केला होता. लोकांनी या व्हिडिओला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. विशेष म्हणजे या मुलींच्या डान्सच्या स्टेप्स सुद्धा जशाच्या तशा कॉपी केल्या जातायत. हा चिमुकला सुद्धा त्याच व्हिडिओला कॉपी करताना दिसतोय.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.