आयफोन 16 प्रो घेऊन भीक मागतोय, मग भिकारी कोण?; देवा ! काय चाललंय काय?
अजमेरच्या उरूसात एका भिकाऱ्याचा 2 लाख रुपयांचा आयफोन 16 प्रो मॅक्स वापरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे लोकांमध्ये आश्चर्य आणि चर्चा सुरू झाली आहे. भिकाऱ्याकडे एवढे पैसे कुठून आले, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Trending : तुम्ही अनेक ट्रेंडिंग न्यूज वाचल्या असतील. अनेक ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिले असतील. पण आजची न्यूज वाचून तुम्हाला धक्का बसेल. तुमची कमाई अर्धा लाख, लाखभर असली तरी आयफोन घेणं तुम्हाला परवडत नाही. त्यामुळे तुम्ही स्वस्तातील स्मार्ट फोन घेता. पण एक भिकारी चक्क आयफोन… तोही साधासुधा नव्हे आयफोन 16 प्रो घेऊन भीक मागतोय. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.या भिकाऱ्याकडील आयफोन पाहून अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. भिकारी कोण? तो की आपण? असा प्रश्न या लोकांना पडला आहे. तर, काहीजण देवा… चाललंय काय? अशी प्रतिक्रिया देत आहेत.
राजस्थानच्या अजमेरमध्ये हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा 813 वा उरूस पार पडला. जगभरातील लोक या उरुसात सामील झाले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेरच्या दर्ग्यावर चादर चढवली. अनेक भाविकांनी चादर चढवली. दुवा मागितली. या उरुसाला अजमेरमध्ये प्रचंड गर्दी असते. पण या गर्दीतही एका भिकाऱ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अजमेर येथे बाजारात हा भिकारी दिसला. त्याच्या हातात 16 PRO MAX आयफोन होता. आयफोनवर बोलत बोलतच तो भीकही मागत होता. या आयफोनची किमत 2 लाख रुपये आहे.
मेरे पास आयफोन है…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ राजस्थानच्या अजमेरचा आहे. सध्या उरुस असल्याने या ठिकाणी भीक मागणाऱ्यांची चांगलीच चांदी झाली आहे. या भिकाऱ्यांकडे एवढा पैसा आहे की दोन लाख रुपयांचा आयफोन घेऊन ते भीक मागत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही डोकं धरून बसाल. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडिओतील या व्यक्तीचे दोन्ही पाय नाहीयेत. लाकडाच्या एका ट्रॉलीवरून तो भीक मागतो. या भिकाऱ्याच्या हातात आयफोन 16 Pro Max दिसत आहे. यावर लोक त्याला विचारतात तुझ्याकडे कोणता फोन आहे. त्यावर हा भिकारी मी आयफोन वापरतोय असं सांगत या व्यक्तीला फोनही दाखवत आहे.
तोंडात बोटं घातली
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. भिकाऱ्याकडे आयफोन पाहून एका यूजर्सने म्हटलंय, ख्वाजा जी सर्वांसाठी नवाज राहा. अजमेर येथे प्रसिद्ध सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी उरुस भरतो. देशविदेशातून लोक येतात. मंत्री, खासदार, सेलिब्रिटीही या ठिकाणी येतात. त्यामुळेच या ठिकाणी भिकाऱ्यांचाही मोठा सुळसुळाट असतो. या ठिकाणी येणारे जाणारे दरवर्षी किमान सात लाख रुपये भीक म्हणून देत असतात. त्यामुळेच एका भिकाऱ्याच्या हातात आयफोन 16 प्रो मॅक्स पाहून सर्वच आश्चर्यचकीत होऊन तोंडात बोटं घालत आहेत.
भाई, मी तर नोकरी सोडून…
हा व्हिडिओ luzinakhan या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे, त्याला आतापर्यंत 5.4 मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे आणि अनेक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर यूजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एक यूजर म्हणाला… “ख्वाजा साहब सर्वांना नवाजत आहेत.” दुसऱ्या यूजरने लिहिले… “भाई, मी तर नोकरी सोडून भीक मागायला जाईन.” आणि तिसऱ्या यूजरने म्हटलंय… “माझ्याहून जास्त श्रीमंत अजमेरचे भिकारी आहेत, असं वाटतंय.”