Best Places Visit in India : चलो बॅग भरो और निकल पडो… भारतातील ‘या’ ठिकाणांना हिवाळ्यात नक्की भेट द्या

सणासुदीबरोबरच गुलाबी थंडीलाही सुरुवात झालीये. जर तुम्हाला थंडी आवडत असेल तर हा महिना प्रवासासाठी परफेक्ट आहे. तुम्हाला आम्ही अशाच थंडीत फिरण्यासाठी काही टॉप ५ बेस्ट प्लेस सजेस्ट करतोय चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या प्लेसेस...

Best Places Visit in India : चलो बॅग भरो और निकल पडो... भारतातील 'या' ठिकाणांना हिवाळ्यात नक्की भेट द्या
Best Places To Visit India in winter
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 4:32 PM

Best Places To Visit In November 2023 :  दिवाळी सुरू होतेय, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सगळेच जण कुठे तरी बाहेर जाण्याचा प्लान करतात. बाहेर फिरायला जायची इच्छा असते. पण नेमकं जायचं कुठं? हा प्रश्न आपल्या मनात पहिला येतो. तुम्हाला देखील असाच प्रश्न पडलाय का? काळजी करू नका, आम्ही तुम्हाला या सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरण्यासाठी भन्नाट अशा काही ठिकाणांची नावं सुचवणार आहोत.

सणासुदीबरोबरच गुलाबी थंडीलाही सुरुवात झालीये. जर तुम्हाला थंडी आवडत असेल तर हा महिना प्रवासासाठी परफेक्ट आहे. तुम्हाला आम्ही अशाच थंडीत फिरण्यासाठी काही टॉप ५ बेस्ट प्लेस सजेस्ट करतोय चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या प्लेसेस…

गुजरात, कच्छ

गुजरातमधील कच्छच्या रणची पांढरी शुभ्र वाळू खूपच जादुई दिसते. गुजरातमधील वाळवंटाचं सौंदर्य हिवाळ्यात अधिकच खुलून दिसतं. गुजरात हे भारतातील सुंदर राज्यांपैकी एक आहे. गुजरातमधील संस्कृती, समृद्ध वारसा अन् स्वादिष्ट पाककृती पर्यटकांना आकर्षित करते. गुजरातला ‘द लॅंड ऑफ लिजेंड्स’ असेही म्हटले जाते. त्यामुळे परदेशी पर्यटकही गुजरातमध्ये दाखल होतात.

राजस्थान, भरतपूर

हिवाळ्यात राजस्थान येथील भरतपूर येथे आवर्जून पर्यटक येतात. भरतपूर पक्षी अभयारण्य हे पक्षीप्रेमींसाठी बेस्ट प्लेस आहे. इथे पक्ष्यांच्या सुमारे 370 प्रजाती आहेत आणि जसजसा नोव्हेंबर महिना जवळ येतो, तसतसे परदेशी पाहुणे स्थलांतरित पक्षी हिवाळ्यासाठी येथे येतात. अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, चीन आणि सायबेरिया येथूनही मोठ्या प्रमाणात पाणपक्षी येथे स्थलांतरित होतात.

गोवा

दरवर्षी गोव्यात आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात जगभरातील प्रसिद्ध कलाकार, चित्रपट निर्माते, समीक्षक आणि चित्रपट प्रदर्शित केले जातात. नोव्हेंबर महिन्यात गोव्याचे हवामानही चांगले असते. त्यामुळे तुम्ही गोव्याला नक्की भेट द्या

अमृतसर, पंजाब

अमृतसर येथील सुवर्णमंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक आहे. अमृतसरमध्ये गुरुपर्व हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी येथील प्रसिद्ध सुवर्णमंदिराला सुंदर अशी सजावट करण्यात येते. गुरुपर्व निमित्त ठिकठिकाणी लंगरचे केलेल आयोजनही तुम्हाला पाहता येते

शिलाँग, मेघालय

येथे दरवर्षी नोव्हेंबरमध्ये शिलाँग चेरी ब्लॉसम फेस्टिव्हलचं आयोजन होते. या काळात अनेक मोठे कलाकार येथे येऊन आपली कला सादर करता. त्यामुळे संस्कृती, खाद्यपदार्थ, कला आणि संगीत याविषयी तुम्ही इन्ट्रेस्टेड असाल तर या महिन्यात तुम्ही नक्की येथे ट्रिप प्लान करू शकतात.

Non Stop LIVE Update
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?.
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?.
111 एकरवर भव्यसभा, मैदान मराठ्यांनी हाऊसफुल्ल, जिथं नजर तिथं भगवं वादळ
111 एकरवर भव्यसभा, मैदान मराठ्यांनी हाऊसफुल्ल, जिथं नजर तिथं भगवं वादळ.
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ.
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप.
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.