जंगलात तरुणांसोबत हैराण करणारे कांड; झुडपात लपलेल्या त्या प्राण्याने केला हल्ला, Viral Video
Big Snake Attack : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक घटना पोस्ट होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहताच तुमच्या काळजात पण धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.

सध्या समाज माध्यमावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांच्या मनात धस्स होत आहे. तर काहींच्या अंगावर काटा येत आहे. काही मुलं ही जंगलातील एका नदीत पोहताना या व्हिडिओत दिसते. त्यातील काही जण पाण्यात पोहत होते. काही जण दंगा मस्तीत गुंग होते. काही जण मोबाईलमध्ये चित्रिकरण करत होते. त्यातील काही मुलं ही झाडीत खडकावर बसलेली होती. पण तेव्हाच एका मोठ्या सापाने एका मुलावर हल्ला चढवला आणि सर्वच जण दहशतीखाली आली. एका झटक्यात या मुलांची मस्ती जिरली. अगदी काही सेंकदात तिथले वातावरण पूर्णपणे बदलले.
या व्हिडिओत नदी वाहताना दिसते. हिरवळ आणि हिरवीगार झाडी दिसते. एका सखोल भागातील पाण्यात काही मुलं पोहत आहेत. काही कॅमेऱ्यासमोर नाचताना, टी-शर्ट काढताना दिसतात. पण तेव्हाच झाडीत एक मोठा साप मुलाच्या दिशेने येतो आणि त्याला चावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो मुलगा जीवाच्या आकांताने लागलीच तिथून पुढे उडी मारतो. हा सर्व प्रसंग व्हिडिओत कैद झाला आहे. ते दृश्य पाहताच सर्वच जण पळ काढतात. काही जण झाडीत त्याला नजरेने शोधतात आणि पटापट पाण्याच्या बाहेर येतात. ही सर्व दृश्य नॅशनल जिओग्रॉफीवरील एखाद्या चित्रिकरणासारखे भासते.
अब यह भाई कभी जंगलों में नहाने नहीं जाएंगे, इनकी जंगलों में रील बनाने की एक बीमारी खत्म हो गई 😃 pic.twitter.com/AAvuL50y1d
— Bhanu Nand (@BhanuNand) July 5, 2025
हल्ला होताच आरडाओरड
हे मित्र जंगलातील एका नदीत आनंद घेताना दिसतात. एक मुलगा झाडीशेजारील खडकावर बसलेला दिसतो. त्याचवेळी झटक्याने अजगर सारखा हा साप येऊन त्याच्यावर हल्ला करतो. तितक्याच चपळपणे हा मुलगा पुढे उडी मारतो. साप पुन्हा झाडीत जातो. ही सर्व घटना इतक्या लवकर होते की त्यातील काहींना ते कळत सुद्धा नाही. पण काही तरी मोठे कांड घडल्याचा अंदाज येताच सर्वच जण तिथून काढता पाय घेतात.
सापाने हल्ला करताच सर्व दोन सेकंद एकाच जागी खिळतात. त्यांना काय करावे हे सुचत नाही. नंतर एकच आरडाओरड सुरू होते. जो तो पळत सुटतो. सगळेच हादरून गेलेले, घाबरलेले दिसतात. आता सर्वांना जीव वाचवायची घाई झालेली दिसते. ज्याला जसा मार्ग सापडेल, तसा तो पळत सुटतो. या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडला आहे. @BhanuNand या एक्स खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.