मंजिल अभी भी बाकी है! 11 महिन्यांपासून प्रवास करणारी ही 832 चाकांची गाडी, कधी पोहचणार?

प्रवासाला 11 महिने उलटूनही या अणुभट्ट्या त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत.

मंजिल अभी भी बाकी है! 11 महिन्यांपासून प्रवास करणारी ही 832 चाकांची गाडी, कधी पोहचणार?
Trailer from gujrat portImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 5:50 PM

अवजड सामान घेऊन जाणारे मोठे ट्रेलर तुम्ही पाहिले असतील. लांब पल्ल्याच्या प्रवासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जड माल नेण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. सहसा, सर्व ट्रेलर्स प्रवास करण्यासाठी बरेच दिवस लागतात. पण आजकाल एक ट्रेलर त्याच्या कासवाच्या गतीमुळे प्रचंड चर्चेत आहे. गुजरातच्या मुद्रा बंदरातून निघालेली ही गाडी दोन अणुभट्ट्या घेऊन पाचपदरा रिफायनरीला जाणारे. मात्र प्रवासाला 11 महिने उलटूनही या अणुभट्ट्या त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत.

खरं तर या ट्रेलर्सचा वेग खूप कमी आहे. ते एका दिवसात फक्त 15-20 किलोमीटर धावू शकतात. अनेक वेळा ते एका दिवसात फक्त 5 किलोमीटर अंतर पार करतात.

तज्ञांचा असा विश्वास आहे की ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणखी 1 महिना लागेल. त्याचा सरासरी वेग काढला तर एखादा माणूस या वेगाने चालू शकतो.

गंमत म्हणजे त्यावर भारलेल्या अणुभट्ट्या खूप जड असतात. त्यापैकी एकाचे वजन 1148 मेट्रिक टन आहे. तर यासोबत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरचे वजन 760 मेट्रिक टन आहे. नर्मदा नदी पार करण्यासाठी या ट्रेलर्सवर 4 कोटी रुपयांचं बजेट आलं होतं.

तब्बल 25 कर्मचाऱ्यांची एक टीम नेहमीच या ट्रेलरसह फिरत असते. ट्रेलर ऑपरेटर, हेल्पर आणि तंत्रज्ञ अशा अनेक लोकांचा या टीममध्ये समावेश आहे.

खास यासाठी अनेक ठिकाणी तात्पुरते रस्तेही तयार करण्यात आले आहेत. मोठ्या ट्रेलरमध्ये एकूण 448 टायर आहेत, तर दुसऱ्या ट्रेलरमध्ये 384 टायर आहेत.

त्यांना पुढे खेचण्यासाठी व्होल्वो ट्रकचा वापर केला जातोय. मदतनीस आणि तंत्रज्ञांची टीम या ट्रकच्या मार्गातील अडथळे दूर करत असते.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.