आजींची भाजी विक्रेता म्हणून नव्या आयुष्याला सुरुवात! 75 वर्षीय आजी आधी कचरा उचलत होत्या, व्हिडीओ व्हायरल
IAS अधिकारी अवनीश शरण यांनी ते शेअर केले आणि या पोस्टला 'इन्सानियत' असे कॅप्शन दिले.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक ब्लॉगर भाजी विक्रेता म्हणून नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या 75 वर्षीय महिलेला कचरा उचलण्यास मदत करताना दिसतोय. या व्हिडीओने आयएएस अधिकारी अवनीश शरण यांचं लक्ष वेधून घेतलंय. जे अनेकदा आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर मोटिव्हेशनल पोस्ट शेअर करतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुकत्याच केलेल्या आपल्या पोस्टमध्ये, IAS अधिकारी अवनीश शरण यांनी ते शेअर केले आणि या पोस्टला ‘इन्सानियत’ असे कॅप्शन दिले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
3 ऑगस्ट रोजी ब्लॉगर तरुण मिश्रा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या 90 सेकंदाच्या या क्लिपमध्ये ही महिला डस्टबिनमधून कचरा उचलताना दिसत आहे. ती ब्लॉगरला सांगते की ती काही पैशाच्या बदल्यात तो कचरा विकते.
तिची ही दुर्दशा पाहून ब्लॉगर तिला भाजी विक्रेता म्हणून नवा व्यवसाय उभा करण्यास मदत करतो. तो तिच्या घरी जातो आणि नंतर तिला बाजारात घेऊन जातो.
Humanity.??? pic.twitter.com/NUZTGEB6Cp
— Awanish Sharan (@AwanishSharan) October 18, 2022
व्यवसाय सुरू करण्यासाठी तो वृद्ध महिलेला गाडी, वजनकाटा आणि भाजीपाला खरेदी करण्यास मदत करतो. ब्लॉगर तिच्या घरातील दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तिला किराणा सामान देखील खरेदी करून देतो. अनेक जणांनी या हृदयस्पर्शी व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आजच्या काळात अशी माणुसकी
