झुम मिटींग सुरु असताना खासदाराने केली कॉफीच्या कपामध्ये लघवी, टीकेची झोड उठल्यानंतर माफी

कॅनडा येथील खासदार विलियम अमोस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरु असताना चक्क कॉफीच्या कपामध्ये लघवी केली आहे. (canadian mp william amos urinate in coffee cup)

झुम मिटींग सुरु असताना खासदाराने केली कॉफीच्या कपामध्ये लघवी, टीकेची झोड उठल्यानंतर माफी
William-Amos

ओटावा : कोरोना महामारीमुळे सगळं जग बदललं आहे. लोकांच्या भेटण्याच्या, बैठकीच्या पद्धती बदलल्या आहेत. मात्र, यादरम्यान काही विचित्र प्रकार समोर येत आहेत. कॅनडा येथील खासदार विलियम अमोस (William Amos) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरु असताना चक्क कॉफीच्या कपामध्ये लघवी केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी बिनशर्थ माफीदेखील मागितली. मात्र, संसदेचे सदस्यांची मिटींग सुरु असताना खासदाराने कपामध्ये लघवी केल्यामुळे त्यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. (Canadian MP William Amos urinate in coffee cup while zoom call)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार कॅनडामधील संसद कॅनडा हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांची मिटींग सुरु होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही मिटींग सुरु होती. यावेळी खासदार विलियम अमोस यांनी एका कॉफीच्या कपामध्ये लघवी केली. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. सोशल मीडियावर तर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनेकजण विलियम अमोस यांच्यावर उपहासात्मक टीका करत आहेत.

विलियम अमोस यांच्याकडून माफी

हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी बिनशर्थ माफी मागितली. त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल स्पष्टीकरण देताना त्यांनी “झुम मिटींग सुरु असताना माझा कॅमेरा बंद होता, असे मला वाटले. त्यामुळे मिटींदरम्यान मी लघवी केली. मात्र, नंतर मला माझी चूक लक्षात आली. मी जे काही केले त्याबद्दल माफी मागतो,” असे सांगितले. 28 मे रोजी त्यांनी ट्विटरवर त्यांचे अधिकृत स्टेटमेंट अपलोड केलेले आहे. ही घटना 26 मे रोजी घडली.

दरम्यान, विलियम अमोस यांनी अशा प्रकारचे कृत्य पहिल्यांदाच केले आहे असे नाही. तर महिन्याभरापूर्वी संसदेचे कामकाज व्हि़डीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत असताना ते नग्नावस्थेत दिसले होते. यावेळीसुद्धा त्यांच्या लॅपटॉपचा कॅमेरा सुरुच राहिला होता.

इतर बातम्या :
PNB Scam भारतातून पळाल्यावर मेहुल चोक्सीने एंटीगाच्या विरोधी पक्षनेत्यांना लाच दिली, पंतप्रधान ब्राउन यांचा गंभीर आरोप

बोरिस जॉन्सन यांनी गुपचूप लग्न उरकलं, साठीच्या उंबरठ्यावर आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात

व्हिएतनाममध्ये सापडला कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट, हवेतून वेगाने संसर्ग

(Canadian MP William Amos urinate in coffee cup while zoom call)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI