चॉकलेट खा आणि दिवसाला 27 हजार रुपये कमवा

Namrata Patil

|

Updated on: Jan 30, 2021 | 11:05 PM

विशेष म्हणजे जगातील कोणत्याही कोपऱ्यात राहून तुम्ही हा जॉब करु शकता. (Candy Funhouse Company Is Hiring Candidates To Taste Chocolates)

चॉकलेट खा आणि दिवसाला 27 हजार रुपये कमवा
डार्क चॉकलेट खाल्ल्यास होतात हे उत्तम फायदे
Follow us

नवी दिल्ली : चॉकलेट हे नाव जरी उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं. अनेकजण चॉकलेट खाण्याचे बहाणे शोधत असतात. त्यातून जर ते चॉकलेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळाले, तर मग ते खाण्याची मजाच काही औरच असते. पण जर कोणी तुम्हाला चॉकलेट आणि टॉफी खाण्यासाठी पैसे दिले तर….आश्चर्य वाटतंय ना. पण हे खरं आहे. एका कंपनीने चॉकलेट प्रेमींसाठी जॉब ऑफर केला आहे. यासाठी तुम्हाला फक्त चॉकलेट खाण्यासाठी पैसे मिळत आहे. विशेष म्हणजे जगातील कोणत्याही कोपऱ्यात राहून तुम्ही हा जॉब करु शकता. (Candy Funhouse Company Is Hiring Candidates To Taste Chocolates)

कँडी फनहाऊस असे हटके जॉब ऑफर करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी कॅनडा या ठिकाणी आहे. या कंपनी काढलेल्या जाहिरातीनुसार, या कंपनीला फुल टाईम आणि पार्ट टाईम दोन्ही शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी हवे आहेत. या जॉबसाठी तुम्हाला फक्त चॉकलेट खायचे आहे. त्याची चव चांगली आहे की नाही? हे फक्त सांगायचे आहे. तसेच जर तुम्हाला याची चव आवडली नाही तर त्यात सुधारणा करण्यासाठी तुम्हाला सूचना करायच्या आहेत.

पगार किती?

कंपनीने यासाठी खास जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार कंपनीला कँडिओलॉजिस्ट या पदासाठी लोक हवे आहेत. कंपनीने जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार, या उमेदवारांना तासाभरासाठी 47 डॉलर दिले जाणार आहेत. जर तुम्ही आठ तासांसाठी काम केले असाल 376 डॉलर्स म्हणजेच एका दिवसाचे 27 हजार 447 रुपये मिळू शकतात. (Candy Funhouse Company Is Hiring Candidates To Taste Chocolates)

जर तुम्ही महिनाभर हा जॉब केलात तर तुम्हाला 8 लाख 23 हजार 400 रुपये इतका पगार मिळू शकतो. म्हणजेच तुम्ही वर्षभर हा जॉब केला, तर तुम्हाला 1 कोटी रुपये पगार मिळू शकतो. विशेष म्हणजे यात तुम्ही वर्क फ्रॉम होमही करु शकता.

कॅनेडाच्या ओंटारियाच्या सिनिसाऊ शहरातील ही कंपनी आहे. कँडी फनहाऊस ही कंपनी आहे. कंपनीला कँडिओलॉजिस्ट (Candyologist) या पदासाठी लोक हवे आहेत. कँडी फनहाऊस या कंपनीने वेबसाईटवर जाहिरात दिली आहे. (Candy Funhouse Company Is Hiring Candidates To Taste Chocolates)

संबंधित बातम्या : 

थायलंडच्या राजाचा थाटच न्यारा, 1400 आक्षेपार्ह फोटो लीक झालेल्या गर्लफ्रेण्डला केलं राणी

दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती, पत्नीने थेट केला चाकून हल्ला; नंतर समोर आलं सत्य

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI