उपरका बाल मत काटो, टकलू हो जाऊंगा, नाकावर लटका राग, ‘त्या’ चिमुरड्याचा नवा व्हिडीओ

उपरका बाल मत काटो, टकलू हो जाऊंगा, नाकावर लटका राग, 'त्या' चिमुरड्याचा नवा व्हिडीओ
चंद्रपूरच्या चार वर्षीय अनुश्रुत पेटकरचा नवा व्हिडीओ

अनुश्रुतचे वडील अनुप पेटकर यांनी सलूनमध्ये हेअर कट होत असताना पुन्हा आपल्या लेकाचा व्हिडीओ कॅमेराबद्ध केला (Angry Kid Baby Viral Video)

अनिश बेंद्रे

|

Jan 25, 2021 | 12:06 PM

मुंबई : सलूनमध्ये केस कापताना ‘चिडलेल्या’ चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. चंद्रपूरच्या चार वर्षीय अनुश्रुत पेटकरचा नवा व्हिडीओ आता समोर आला आहे. ‘नागपूर में क्यो आये हो तुम?’, ‘उपरका बाल मत काटो, टकलू हो जाऊंगा’ असे एकापेक्षा एक डायलॉग मारुन अनुश्रुत पुन्हा सर्वांचं मनोरंजन करत आहे. (Chandrapur Angry Kid Baby Anushrut Petkar New Viral Video on Social Media while Hair Cut)

‘गंदा लग रहा है’

अनुश्रुतचे वडील अनुप पेटकर यांनी सलूनमध्ये हेअर कट होत असताना आपल्या लेकाचा व्हिडीओ कॅमेराबद्ध केला होता. पहिल्या व्हिडीओला तूफान लोकप्रियता मिळाल्यानंतर आता अनुश्रुतच्या नव्या बाललीला समोर आल्या आहेत. ‘तुमका कैसा लग रहा है?’ असा प्रश्न सलूनवाल्याने विचारल्यानंतर अनुश्रुतने तोंड पाडून ‘गंदा लग रहा है’ असं उत्तर दिलं. ‘टायगर कैसे चिल्लाता है?’ असं सलूनवाल्याने विचारल्यावर अनुश्रुतने वाघाची डरकाळी फोडून दाखवली.

‘मै तुम्हे नाखून चुबाऊंगा’

‘नागपूर में क्यो आये हो तुम?’ असा थेट प्रश्नच अनुश्रुतने सलूनवाल्याला विचारला. त्यावर तुझे केस कापायला, असं भन्नाट उत्तर त्याला मिळालं. त्यामुळे चिडलेल्या अनुश्रुतने मै तुम्हे नाखून चुबाऊंगा, फिर उसके बाल कट करुंगा, असा इशाराच दिला.

‘टकलू हो जाऊंगा’

‘आपके कैची मे काटा है क्या?’ अशा प्रश्नांची सरबत्ती थांबतच नव्हती. सलूनवालाही न थकता त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करत होता. सलूनवाल्याने डोक्याचे वरचे केस कापायला घेतले असता, ‘उपर का नही काटना, टकलू हो जाऊंगा’ अशी भीतीच त्याने व्यक्त केली आणि सगळ्यांना हसू फुटलं.

पाहा नवा व्हिडीओ :

अनुश्रुतची गोड धमकी

“अरे बापरे क्या कर रहे हो तुम, मै गुस्सा हू, मै मारुंगा तुमको, मै तुम्हारी कटिंग करुंगा, मै बहुत बडा हू” असं गाल फुगवून, डोळ्यातून पाणी काढत बोलणाऱ्या अनुश्रुतचा पहिला व्हिडीओ चटकन प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला. केस कापताना आलेला राग, त्याची हतबलता आणि गोबऱ्या गालामध्ये ठासून भरलेली निरागसता याचा सुरेख संगम पहिल्या व्हिडीओत पाहायला मिळाला होता.

चार वर्षाचा अनुश्रुत भलताच खोडकर आहे. पहिल्यांदा व्हिडीओ काढला जाताना त्याचे चिडलेले हावभाव बघून आईने त्याचा व्हिडीओ घेण्याची सूचना केली. मात्र सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडीओला असा उदंड प्रतिसाद मिळेल, याची पुसटशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती.

संबंधित बातम्या :

“मोदींनी 15 लाख बुडवले, पण काकूंनी तक्रार केली नाही, आता 1800 ची नोट काढा” व्हायरल काकूंनंतर काका जोशात

खदखदखद लाव्हा रस… वऱ्हाडी भाषेत ऑनलाइन क्लास, मास्तर नितेश कराळे सोशल मीडियावर लोकप्रिय

अरे यार…! केस कापताना लटका राग, चंद्रपूरचा अनुश्रुत पेटकर सोशल मीडियावर हिट

(Chandrapur Angry Kid Baby Anushrut Petkar New Viral Video on Social Media while Hair Cut)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें