AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | प्रेशर कुकरमध्ये गोलगोल चपात्या बनवण्याचा देसी जुगाड! व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले अवाक्

सध्या एक महिला प्रेशर कुकरमध्ये गोगोल चपात्या बनवत असल्याच्या व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या अनोखा ‘जुगाड’ पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.

Video | प्रेशर कुकरमध्ये गोलगोल चपात्या बनवण्याचा देसी जुगाड! व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले अवाक्
प्रेशर कुकरमध्ये चपाती
| Updated on: May 22, 2021 | 1:15 PM
Share

मुंबई : आपण आपल्या आईला घरी तव्यावर चपाती भाजताना पहिले आहे. रुमाली रोटी आणि तंदुरी रोटी बनवण्याची प्रक्रिया मात्र काहीशी वेगळी असते. परंतु, आपण रोज घरात जी चपाती खातो ती तव्यावरच शेकून बनवली जाते. मात्र, सध्या एक महिला प्रेशर कुकरमध्ये गोगोल चपात्या बनवत असल्याच्या व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या अनोखा ‘जुगाड’ पाहून सगळेच अवाक् झाले आहेत (Chapati In Pressure cooker video goes viral on internet).

या व्हिडीओत महिला चक्क छोट्या आकाराच्या प्रेशर कुकरमध्ये लाटलेली चपाती टाकून ती शेकताना दिसत आहे. यानंतर अवघ्या दोनच मिनिटांत ही चपाती तयार झालेली दिसते.

पाहा व्हिडीओ :

आपण या व्हिडीओत या महिलेचा भन्नाट जुगाड पाहू शकता. घरगुती चपात्या या नेहमीच तव्यावर तयार केल्या जातात. पण इथे या महिलेने चक्क कुकरचा वापर केला आहे. साधारण कुकरमध्ये डाळ, भात आणि भाज्या शिजवल्या जातात. पण चपाती-पोळी बनवण्याचा जुगाड सगळ्यांनीच पहिल्यांदाच पहिला असावा (Chapati In Pressure cooker video goes viral on internet).

‘या’ ठिकाणी पाहू शकता व्हिडीओ

देसी जुगाडचा हा व्हिडीओ ‘Fun N Fashion’ नामक एका युट्युब चॅनेलवर शेअर केला गेला आहे. ज्याला आतापर्यंत 1500 व्हुव आणि 41 लाईक मिळाले आहेत. जर युट्युबच्या सर्च बॉक्समध्ये Chapati In Pressure Cooker असे लिहिले असता, थेट हा व्हिडीओ शोधता येतो. मात्र, याच वेळी असेच अनेक व्हिडीओ देखील दिसतात. ज्यामुळे हे लक्षात येते की, हा जुगाड नवा नसून, आतापर्यंत अनेकांनी करून पहिला आहे.

काय आहे नेमकं ‘या’ व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओत महिला 3 चपात्या छान गोलाकार आकारात लाटून घेते. मोठ्या आचेवर गॅस सुरु ठेवून त्यावर कुकर ठेवून त्यात तिन्ही चपात्या एकत्र टाकून झाकण बंद करते. त्यानंतर दोन बोटं दाखवून दोन मिनिटांचा इशारा करते. यानंतर ती प्रेशर कुकरचे झाकण उघडून त्यातून चपात्या बाहेर काढते. या चपात्या ती जेव्हा ताटात काढते तेव्हा त्या छान शेकलेल्या दिसतात. हे दृश्य खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे.

(Chapati In Pressure cooker video goes viral on internet)

हेही वाचा :

VIDEO : क्यूट बाळाने गायलं ‘जीने मेरा दिल लुटया’, चकीत करणारा व्हिडीओ पाहाच!

तरुणीने सोनू सूदला केली बॉयफ्रेण्ड देण्याची विनंती; काही क्षणांतच तीची इच्छा पूर्णही झाली

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.