AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगा कासव समजून नाल्यातल्या प्राण्याशी खेळत होता, पण जेव्हा खरं समोर आलं, तेव्हा सगळेच हादरले!

जो ब्रेनर असे या व्यक्तीचे नाव आहे. जोला 2 वर्षांचा मुलगा आहे. घटनेच्या दिवशी, जोचा मुलगा जॅक्सनविले येथील कॅन्टिना रेस्टॉरंटच्या बाहेर एका नाल्याजवळ खेळत होता.

मुलगा कासव समजून नाल्यातल्या प्राण्याशी खेळत होता, पण जेव्हा खरं समोर आलं, तेव्हा सगळेच हादरले!
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 1:19 PM
Share

फ्लोरिडा, अमेरिका: कधी कधी आपण संकटांना फार छोटं समजतो, पण ती लपलेली संकटं फार मोठी असतात. अशीच एक घटना अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये घडली आहे. मुलं फार निरागस असतात. कधी कधी त्याचा हाच निरागसपणा त्याच्या आयुष्याला अडचणीत आणतो. सध्या फ्लोरिडामध्ये सोशल मीडियावर एक प्रकरण चांगलंच गाजतं आहे, ज्यामध्ये मुलाचा निरागसपणा त्याच्यासाठी जीवघेणा ठरला असता. हा चिमुरडा वडिलांच्या हॉटेलजवळील नाल्याजवळ खेळत होता. त्याला नाल्यात अचानक एक प्राणी दिसला. मुलाने त्या प्राण्याला कासव (Child Playing With Alligator) समजलं आणि त्याच्याशी खेळायला सुरुवात केली. मात्र वडिलांनी आपल्या मुलाला या प्राण्याशी खेळताना पाहिल्यावर त्यांची भांबेरीच उडाली (Child Playing With Alligator and assume that is Turtle US Florida Incident )

जो ब्रेनर असे या व्यक्तीचे नाव आहे. जोला 2 वर्षांचा मुलगा आहे. घटनेच्या दिवशी, जोचा मुलगा जॅक्सनविले येथील कॅन्टिना रेस्टॉरंटच्या बाहेर एका नाल्याजवळ खेळत होता. अचानक त्याची नजर नाल्यातून बाहेर पडणाऱ्या एका प्राण्यावर पडली. 2 वर्षाच्या मुलाला वाटले की ते कासव आहे. ते मूल कासव समजून या प्राण्याशी खेळत राहिलं. यादरम्यान, मुलगा नाल्यात कासव आहे हे सांगण्यासाठी जो जवळ आला. कासव सांगितल्यावर जो चा मुलगा बाहेर आला आणि या प्राण्याशी खेळू लागला. दरम्यान, मुलाला पाहण्यासाठी जो जेव्हा बाहेर आला, तेव्हा समोरचं चित्र पाहून त्याची भांबेरी उडाली.

खरं तर, जोचा मुलगा, ज्या प्राण्यासोबत कासव समजून खेळत होता, ती एक मोठा मगर होती. नाल्यात लपलेली मगर बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या मुलाला मगरीच्या एवढ्या जवळ पाहून जो च्या पायाखालची जमीन सरकली. त्याने ताबडतोब आपल्या मुलाला नाल्यातून दूर नेले. यानंतर बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली. शहरालगतच्या नाल्याजवळ एवढी मोठी मगर कुठून आली, याचा शोध घेतला जात आहे. सुदैवाने जो याने वेळीच मगरीची माहिती दिल्याने अनेकांचा प्राण वाचले.

हेही पाहा:

Video: हातात कोळीला घेऊन खेळवणारी रणरागिणी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हिंमतीचं कौतुक करायला हवं!

Video: बीचवर फिरणारा हा प्राणी खरंच गॉडझिला आहे? जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील प्राणी कोणता?

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.