Video | कुंपणाच्या बाहेर पडण्यासाठी धडपड, हुशार गाढवाची डोकॅलिटी, नेमकं काय केलं पाहाच !

या व्हिडिओमध्ये काही गाढवांना लाकडी कुंपनामध्ये ठेवल्याचे दिसत आहे. यातील बहुतांश गाढव हे कुंपणाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र लाकडी कुंपण असल्यामुळे त्यांना बाहेर येता येत नाहीये.

Video | कुंपणाच्या बाहेर पडण्यासाठी धडपड, हुशार गाढवाची डोकॅलिटी, नेमकं काय केलं पाहाच !
DONKEY VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 7:37 AM

मुंबई : गाढव हा मुर्ख आणि निर्बुद्ध प्राणी असल्याचा एक समज आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीही नाही. गाढव हा इमानदारी आणि मेहनत करण्याची क्षमता असलेला प्राणी आहे. याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरलाय. कारण यामध्ये गाढवाने जे केले आहे, ते पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.

लाकडी कुंपणामुळे गाढवांना बाहेर पडता येत नाहीये

या व्हिडिओमध्ये काही गाढवांना लाकडी कुंपणामध्ये ठेवल्याचे दिसत आहे. यातील बहुतांश गाढव हे कुंपणाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र लाकडी कुंपण असल्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाहीये. कित्येक वेळा प्रयत्न करूनही व्हिडीओतील गाढवं कुंपणाच्या बाहेर पडू शकत नाहीयेत.

गाढवाने कुंपणाचे लाकूड शिताफीने बाजूला केले 

हा सर्व प्रसंग घडत असताना मागे एक हुशार गाढव थांबले आहे. थोड्या वेळानंतर हे गाढव समोर आले. गाढवाने आपल्या तोंडाने लाकडी कुंपण बाजूला केले. कुंपन बाजूला केल्यामुळे गाढवांना रस्ता मोकळा झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

समोरचा रस्ता मोकळा झाल्यामुळे सगळे गाढव मुक्तपणे कुंपणाच्या बाहेर आले आहेत. गाढवाने लावलेलं डोकं पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. नेटकरी या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया देत असून तो तुफान व्हायरल झाला आहे. सध्या हा व्हिडीओ तुम्हाला ट्विटरवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | प्रेम कोणावर करावं ? तरुणांनो इंदोरीकर महाराजांचा हा व्हिडीओ पाहाच, हसून लोटपोट व्हाल !

10 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याची मेहुणी दोन वर्षांपासून फुटपाथवर, वाचा देशभर चर्चेत असलेली बातमी

Video | फिरायला जाण्यासाठी महिला बाहेर पडली, अचानकपणे सापाचा हल्ला, थरार कॅमेऱ्यात कैद