10 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याची मेहुणी दोन वर्षांपासून फुटपाथवर, वाचा देशभर चर्चेत असलेली बातमी

आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वास्तविक, इरा बसू नावाची ही महिला पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattarcharya) यांच्या पत्नीची बहीण आहे.

10 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याची मेहुणी दोन वर्षांपासून फुटपाथवर, वाचा देशभर चर्चेत असलेली बातमी

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताला लागूनच उत्तर 24 परगणा हा जिल्हा आहे. येथील डनलप बारानगर भागातील एका वृद्ध महिलेचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये एक निळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेली महिला दिसत आहे. ती बेघर आहे, फुटपाथवर झोपते आणि जवळच्या रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून मिळेत ते अन्न खाते. तुम्ही म्हणाल की यात काय विशेष आहे, कारण अशी चित्रं भारतात सर्वत्र दिसतात. (Former Bengal CM Buddhadeb Bhattacharya’s sister-in-law found living on footpaths)

तर आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वास्तविक, इरा बसू नावाची ही महिला पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattarcharya) यांच्या पत्नीची बहीण आहे. म्हणजेच ती त्यांची मेहुणी आहे. बुद्धदेव भट्टाचार्य हे 10 वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.

इरा बसूने विषाणूशास्त्रात (वायरोलॉजी) पीएचडी केली आहे. ती नॉर्थ 24 परगनातील प्रियनाथ गर्ल्स हायस्कूलमध्ये जीवनशास्त्र विषय शिकवायची. ती अस्खलित इंग्रजी आणि बंगाली बोलते. इंडिया टुडेच्या एका वृत्तानुसार, इरा राज्यस्तरीय खेळाडू राहिली आहे. ती टेबल टेनिस आणि क्रिकेटही खेळत होती.

आता तुम्ही असा विचार करत असाल की माजी मुख्यमंत्र्यांची मेहुणी असूनही आणि इतकी पात्रता असूनही इराची ही स्थिती कशी आणि का झाली?

इरा बसू यांनी 1976 मध्ये प्रियनाथ गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरीला सुरुवात केली. त्या 28 जून 2009 रोजी निवृत्त झाल्या. त्यावेळी बुद्धदेव भट्टाचार्य पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.

शाळेत शिकवताना त्या बारानगर भागात राहात होत्या आणि सेवानिवृत्तीनंतर खरदाह भागातील लिचू बागान भागात राहायला गेल्या. पण काही काळानंतर एक दिवस इरा अचानक गायब झाल्या. डनलप परिसरातील लोकांच्या मते, त्यानंतर त्या थेट रस्त्यावर दिसू लागल्या. लोकांच्या मते, ही महिला गेल्या दोन वर्षांपासून फुटपाथवर झोपते.

पैशांअभावी ही परिस्थिती उद्भवली

इरा बसू यांची मानसिक स्थिती पूर्णपणे बरी आहे. पण त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यांना पेन्शन मिळत नाही. प्रियनाथ शाळेच्या मुख्याध्यापिका कृष्णाकाली चंदा यांनी पेन्शन का उपलब्ध नाही हे सांगितले आहे. इंडिया टुडेशी बोलताना चंदा म्हणाल्या की, “इरा बसू इथे शिकवायच्या. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर, आम्ही त्यांना पेन्शन देण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांना त्यांची सर्व कागदपत्रे जमा करण्यास सांगितले. पण त्यांनी तसे केले नाही. यामुळे त्यांना कोणतीही पेन्शन मिळत नाही.

इरा बसू यांच्या सध्याच्या परिस्थितीची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन सक्रिय झाले. त्यांनी गुरुवारी 9 सप्टेंबर रोजी खरदाह नगरपालिकेची रुग्णवाहिका पाठवली आणि इरा बसू यांना बारानगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यानंतर वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी कोलकाता येथील रुग्णालयात नेण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.

‘मला व्हीआयपी ओळख नको’

इंडिया टुडेने इरा बसू यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या कुटुंबाशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल त्या म्हणाल्या की, “जेव्हा मी शाळेत शिक्षिक म्हणून माझी कारकीर्द सुरू केली, तेव्हा मी त्यांच्याकडून कोणतीही मदत घेतली नव्हती. मला ते माझ्या कॅलिबरवर मिळाले. मला व्हीआयपी ओळख नको आहे, जरी आता बऱ्याच लोकांना आमच्या कौटुंबिक संबंधांबद्दल माहिती मिळाली आहे, तरीसुद्धा..”

इतर बातम्या

Video | फिरायला जाण्यासाठी महिला बाहेर पडली, अचानकपणे सापाचा हल्ला, थरार कॅमेऱ्यात कैद

Video | विमानाच्या पंखाला लटकून तालिबान्यांची मस्ती, नवा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का ?

Video | लग्न थाटामाटात, पण सासरला जाताना खवळली, नवरीने लगावली नवरदेवाच्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल

(Former Bengal CM Buddhadeb Bhattacharya’s sister-in-law found living on footpaths)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI