अखेर तो दिवस…; लवकरच बंद होणार Covid caller tune? सोशल मीडियावर शेअर होतायत Memes

| Updated on: Mar 29, 2022 | 10:43 AM

Covid caller tune : कोविड कॉलर ट्यूनने आपले डोके उठवले होते. ही ट्यून आता लवकरच बंद होणार आहे. कोरोना महामारीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मागील जवळपास दोन वर्षांपासून या ट्यूनने आपल्याला हैराण केले होते.

अखेर तो दिवस...; लवकरच बंद होणार Covid caller tune? सोशल मीडियावर शेअर होतायत Memes
कोविड कॉलर ट्यून बंद होणार असल्यानं शेअर होताहेत मीम्स
Image Credit source: Twitter
Follow us on

Covid caller tune : कोविड महामारी आणि त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. घरात स्वत:ला बंदिस्त करून घेतले. शिवाय इतर अनेक बंधनांमध्ये आपण होतो. आणखी एक त्रास म्हणजे कोविड कॉलर ट्यून. या कॉलर ट्यूनने आपले डोके उठवले होते. ही कोविड ट्यून आता लवकरच बंद होणार आहे. कोरोना महामारीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मागील जवळपास दोन वर्षांपासून या ट्यूनने आपल्याला हैराण केले होते. आता याला हटविण्याविषयी सरकार विचार करत आहे. अजून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्यांना या ट्यूनचा त्रास होत होता, त्यांनी आता उत्सवच (Celebration) साजरा करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर (Social media) मीम्सचा (Memes) पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.

सहनशीलतेचा अंत पाहण्यासारखेच

2021मध्ये या कॉलर ट्यूनमध्ये काही बदल करण्यात आले होते. पण भलीमोठी कॉलर ट्यून ही समस्या कायम होती. यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागे. अजूनही ही ट्यून सुरूच आहे. एकच एक गोष्ट तीही पाल्हाळपणे सहन करणे म्हणजे लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यासारखेच आहे. आता हीच ट्यून बंद होणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. त्यानंतर ट्विटरवर मीम्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा :

उड्या तर मारून दाखवणारच! लहान मुलांच्या Bouncy Castleमध्ये कसा घुसतो तरूण? हसवणारा Viral video पाहा

Funny dance : यांना कोणीही आवरू शकत नाही! तरुणांच्या नृत्याचा हा Viral video पाहा आणि खळखळून हसा

थोड्याशा मौजमजेनं घेतला जीव! 430 फूट उंच पाळण्यावरून पडला, आई-वडिलांच्या समोर मुलाचा करुण अंत